मत्स्यपालनातून साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:48+5:30

माधव निकुरे यांची गावालगत अडीच एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी केवळ धानपीक घेतले जात होते. पाण्याअभावी बरेचदा धानपीक करपून जात होते. त्यामुळे शेतकरी निकुरे यांनी आपल्या शेतात बोअर खोदून सिंचन सुविधा निर्माण केली. त्यानंतर शेतात भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पादन घेणे सुरू केले. वांगे, टमाटर, चवळीमाट, सांभार, मिरची, भेंडी आदी पीक यशस्वीरित्या घेत आहे.

Progress made in fisheries | मत्स्यपालनातून साधली प्रगती

मत्स्यपालनातून साधली प्रगती

Next
ठळक मुद्देभाजीपाला लागवड । एकोडी गावातील शेतकरी घेतो लाखाचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धान शेतीसोबतच भाजीपाला व मत्स्यपालनाकडे वळून प्रगती साधत असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारची यशस्वी शेती एकोडी येथील शेतकरी माधव निकुरे हे करीत असून वर्षाला जवळपास सात लाखाचे उत्पन्न घेत आहे.
माधव निकुरे यांची गावालगत अडीच एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी केवळ धानपीक घेतले जात होते. पाण्याअभावी बरेचदा धानपीक करपून जात होते. त्यामुळे शेतकरी निकुरे यांनी आपल्या शेतात बोअर खोदून सिंचन सुविधा निर्माण केली. त्यानंतर शेतात भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पादन घेणे सुरू केले. वांगे, टमाटर, चवळीमाट, सांभार, मिरची, भेंडी आदी पीक यशस्वीरित्या घेत आहे. शेतीतील उत्पादन वाढल्यानंतर सदर शेतकºयाने आपल्या शेतात दोन शेततळे स्वत:च्या पैशातून खोदले. मोटारपंपच्या सहाय्याने येथे पाणी करून त्यात मत्स्यबिज सोडले. येथील मत्स्यबिजला दररोज खाद्य पुरवठा करू लागले. अल्पावधीतच येथील मासे खाण्यायोग्य झाले. बाजारपेठेते नेऊन त्याची विक्री सुरू झाली. १२० रुपये किलो दराने शेततळ्यातील मासे विकून शेतकरी निकुरे यांनी उत्पन्न मिळविले. चामोर्शी तालुक्यात अशा प्रकारचे यशस्वीरित्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्पच आहे. परिस्थितीवर मात करून एकाच पिकावर अवलंबून न राहता, यशस्वी शेती करण्याचा संदेश निकुरे यांनी दिला आहे.

कृषी अधिकाऱ्यांनी थोपटली पाठ
केवळ अडीच एकर शेतीमध्ये भाजीपाला, मासे व धान आदींचे उत्पादन घेऊन शेतकरी निकुरे यांनी आपल्या गरीब परिस्थितीवर मात केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी शेतीवर प्रत्यक्ष येऊन पाहिले. दरम्यान अनेकांनी शेतकरी निकुरे यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Progress made in fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.