अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळांची होरपळ थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:39+5:30

अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ५ तालुक्यांचा भार असतो. त्या तुलनेत येथे वैद्यकीय सोयीसुविधांची नेहमीच कमतरता भासते. १०८ क्रमांकावर बोलविली जाणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेसह भौतिक सुविधांचीही कमतरता असते.

Problems to Newborn babies will be stopped at Aheri's sub-district hospital | अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळांची होरपळ थांबणार

अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळांची होरपळ थांबणार

Next
ठळक मुद्देइन्व्हर्टरची व्यवस्था : जि.प.अध्यक्षांच्या आकस्मिक भेटीनंतर सुरू झाली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : परिसरातील पाच तालुक्यांचे रुग्ण सांभाळणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळ आणि बाळंतिणीला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अंधारात आणि गर्मीत होरपळत राहून मोठा त्रास सहन करावा लागत होता. तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली असताना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबत सूचना करताच रुग्णालय प्रशासनाने बाळ-बाळंतिणीला ठेवल्या जाणाºया कक्षातील वीज पुरवठा इन्व्हर्टरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ५ तालुक्यांचा भार असतो. त्या तुलनेत येथे वैद्यकीय सोयीसुविधांची नेहमीच कमतरता भासते. १०८ क्रमांकावर बोलविली जाणारी रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेसह भौतिक सुविधांचीही कमतरता असते.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांचे नातेवाईक अहेरीत नसल्याने त्यांना फक्त शासनामार्फत रुग्णालयात मिळणाºया सुविधांवरच अवलंबून राहावे लागते. दरवर्षी येथे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे पेशंट व नातेवाईकांना बाहेर जाऊन सोय करून घ्यावी लागते.
अशा विविध गैरसोयींबाबत तक्रारी वाढल्याने जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तेथील अव्यवस्था त्यांना दिसली. विशेष म्हणजे त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झालेला असताना वैद्यकीय कर्मचारी इन्व्हर्टवरर चालणाºया विद्युत उपकरणांच्या प्रकाशात आणि पंख्याच्या हवेत बसलेले तर ओली बाळंतीण आणि तिचे नवजात बाळ अंधारात व गर्मीत आक्रोश करत असल्याचे आढळले. ही बाब खटकणारी असल्यामुळे कंकडालवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून योग्य ती दुरूस्ती करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला केली.
त्याची दखल घेत या उपजिल्हा रुग्णालयात नवीन अतिरिक्त लाईन फिटिंग केली जात आहे. आता अत्यावश्यक असलेल्या सर्वच वॉर्डात इन्व्हर्टरचे कनेक्शन देणे सुरू असून येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Problems to Newborn babies will be stopped at Aheri's sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.