विद्यार्थ्यांना सांडपाण्याचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30
तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील नगरम जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या समोर सांडपाणी जमा होते. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या तसेच खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
रस्त्याने आवागमन करणाऱ्या वाहनांमुळे परिसरात खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमध्ये परिसरातील सांडपाणी जमा होऊन राहते. अनेक विद्यार्थी या खड्ड्यांमध्ये पळून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सदर परिसर सोयीचा आहे. परंतु याच ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ग्रामसभेत तसेच तोंडी सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांना विविध रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांडपाण्याच्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होत आहे. याचा त्रास दिवसा विद्यार्थी व शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांनाही होत आहे. त्यामुळे खड्डे बुजवून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी मुख्याध्यापक आर.एम.रच्चावार, सत्यनारायण कोत्तावडला, कंबगौणी सदाशिव, श्रीधर कंबगौणी, सत्यनारायण आईला, राजाराम अरिगेला, समय्या कोडूरी, रवींद्र येरगंधया, किरण गुंडा, रवींद्र गुंडा, प्रिसेलम कोडी, रवीनेना ओल्लाला, नागेश गंटा, राणू कडार्ला, जंपय्या बद्दी, बापू गुट्टू, रमेश तोटा, सल्ला मलय्या, सुरेश कंबगौणी, सदानंदम पेदीट्टी, व्यंकटेशराव कंबगौणी, भिमन्ना कंबगौणी यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
यासंदर्भात संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसचिवांनाही निवेदन देण्यात आले.