देसाईगंजमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:32+5:30

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी न.प.च्या वतीने शहराच्या मुख्य ठिकाणी जनजागृतीचे व दक्षता घेण्याबाबतचे आवाहन करणारे बॅनर्स व होर्ल्डिग्ज लावण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली असून मॉल, व्यायामशाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी काढले आहेत.

Preventive measures launched in Desaiganj | देसाईगंजमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

देसाईगंजमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

Next
ठळक मुद्देस्वच्छतेवर भर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणू संसर्गाची भीती वाढली असून प्रशासन अलर्ट झाले आहे. देसाईगंज शहरात या विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी देसाईगंज नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनजागृतीसोबतच स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी न.प.च्या वतीने शहराच्या मुख्य ठिकाणी जनजागृतीचे व दक्षता घेण्याबाबतचे आवाहन करणारे बॅनर्स व होर्ल्डिग्ज लावण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली असून मॉल, व्यायामशाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी काढले आहेत. न.प.च्या वतीने संपूर्ण शहरात घंटागाडीवर अ‍ॅडिओ क्लिपद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. विर्शी वॉर्डातील खासगी वाहनांचा बसथांबा व शहरातील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांचे हॅन्डवॉश करून स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांनी चमू तयार करण्यात आली असून चमूतील कर्मचारी शहराबाहेरून शहरात येणाºया प्रवाशांचे हात धुऊन देत असून कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

बंदी आदेशानंतरही बाजारपेठ सुरूच
रेल्वे मार्गाची सुविधा असलेल्या देसाईगंज येथे मोठी बाजारपेठ आहे. कापड, किराणा याशिवाय विविध वस्तू येथे ठोक स्वरूपात मिळतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक वस्तू खरेदीसाठी गर्दी करतात. गर्दीमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देसाईगंजातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र या आदेशानंतरही बुधवारी देसाईगंज येथील मुख्य बाजारपेठ सुरू होती. बाजारपेठ बंदबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी न.प.प्रशासनाला केल्या. त्यानंतर पालिकेने देसाईगंज शहरातील मोठ्या व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या. मात्र बुधवारी त्या आदेशाचे पालन झाले नाही.

सेवेसाठी ई-मेलवर पाठवा अर्ज
देसाईगंज नगर परिषद कार्यालयामध्ये विविध कामासाठी बरेच नागरिक दररोज येतात. परिणामी एकमेकाचा संपर्क व गर्दीच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने आॅनलाईन प्रक्रियेचा आधार घेतला आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करीत नगर पालिकेच्या कोणत्याही सेवेसाठी अथवा कामासाठी पालिकेच्या ई-मेलवर अर्ज, निवेदने व माहिती स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली असून नागरिकांनी ई-मेलवर अर्ज, निवेदने पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय विभाग प्रमुखांची व्हॉट्सअ‍ॅप व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ.एम.टी. रामटेके यांनी केले आहे.

Web Title: Preventive measures launched in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.