बैलांची सजावट बघून पोलीस अधिकारी थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:32+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा केली. त्यानंतर सजवलेल्या बैलांचे निरिक्षक करण्यात आले.

Police officers were surprised to see the decoration of bulls | बैलांची सजावट बघून पोलीस अधिकारी थक्क

बैलांची सजावट बघून पोलीस अधिकारी थक्क

Next
ठळक मुद्देसिरोंचा ठाण्यात स्पर्धा : पहिल्यांदाच उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : शेतकरी व पोलीस यांच्यामधील स्नेहाचे संबंध वृध्दींगत व्हावे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन सिरोंचाच्या वतीने पोलीस मैदानात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या बैल जोडींची सजावट बघून पोलीस अधिकारी व जवान थक्क झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा केली. त्यानंतर सजवलेल्या बैलांचे निरिक्षक करण्यात आले. या स्पर्धेत कारासपल्ली, सिरोंचा, जनमपल्ली, सूर्यापल्ली, राजारामपूर, रामाजपूर, मेडाराम, रंगय्यापल्ली येथील एकूण १८ बैलजोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
प्रथम क्रमांक स्वामी पानते यांच्या बैलजोडीने पटकाविला. द्वितीय क्रमांक अंकलू मदरबोईना व तृतीय क्रमांक पदमय्या कुमरी यांनी पटकाविला. पर्यवेक्षक म्हणून अमित तेपट्टीवार, शाम मादेशी, रेखा तेपट्टीवार यांनी काम पाहिले. पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.

Web Title: Police officers were surprised to see the decoration of bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस