खर्राविक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे धाडसस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:30+5:30

१ फेब्रुवारी २०१९ पासून सिरोंचा शहरातील ७० पानठेलाधारकांनी खर्राविक्री बंद केली. यातील ६८ जणांनी पानठेलेच बंद केले तर दोन पानठेलाधारक केवळ पान विकतात. असे असले तरी चोरट्या मार्गाने चहा टपऱ्या, रस्त्यावरील उपहारगृहे व इतरही लहान मोठ्या दुकानांमध्ये खर्रा विक्री होत असल्याचे सांगितले जाते.

Police dare to curb rabbits | खर्राविक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे धाडसस्त्र

खर्राविक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांचे धाडसस्त्र

Next
ठळक मुद्देतपासणी मोहीम : खर्रापन्नी व इतरही कचऱ्याची केली होळी

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : चोरून लपून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असलेल्यांवर अंकुश आणण्यासाठी सोमवारी सिरोंचा पोलिसांनी सकाळीच धाडसत्र मोहीम सुरू केली. शहरातील पानठेले, चहाटपºया, खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले पोलिसांनी तपासले. विशेष म्हणजे संपूर्ण शहरात फिरताना इतरत्र पसरलेल्या खर्रा पन्नी व तंबाखूजन्य पदार्थांचा कचरा गोळा करून त्याची होळी करून परिसर स्वच्छ केला.
१ फेब्रुवारी २०१९ पासून सिरोंचा शहरातील ७० पानठेलाधारकांनी खर्राविक्री बंद केली. यातील ६८ जणांनी पानठेलेच बंद केले तर दोन पानठेलाधारक केवळ पान विकतात. असे असले तरी चोरट्या मार्गाने चहा टपऱ्या, रस्त्यावरील उपहारगृहे व इतरही लहान मोठ्या दुकानांमध्ये खर्रा विक्री होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई व्हावी तसेच ज्यांनी विक्री पूर्णत: बंद ठेवली आहे त्यांनी ती टिकवून ठेवावी, यासाठी सिरोंचा पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी सकाळीच ८ वाजता धाडसत्र राबविले.
यावेळी दोन पानठेल्यांची तपासणी पोलिसांनी केली. त्यासोबतच चहाटपरी, उपहारगृहे यांचीही तपासणी केली. यावेळी कोणताही मुद्देमाल पोलिसांना सापडला नाही. पण शहरात सर्वत्र खर्रा पन्नी व इतरही तंबाखूजन्य पदाथार्चा प्लॅस्टिक कचरा पसरलेला होता. हा सर्व कचरा पोलिसांनी गोळा करून त्याची मुख्य चौकात होळी केळी. यात त्यांना ऑटो चालक - मालक संघटना व शहरातील नागरिकांनी सहकार्य केले. जवळपास २० पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले होते. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे चोरून लपून खर्रा विकणाऱ्यांना धडकी भरली. विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अशी धाडसत्रे सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

विक्रेत्यांनीच गुळसडवे केले नष्ट
बामणी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या जाफराबाद मध्ये दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुळाची आवक केली जात आहे. गत महिन्यात दोन वेळा पोलिसांनी धाड टाकून गुळाचा मोठा साठा जप्त केला आहे. दारू गाळण्यासाठी एकाने सडवा लावल्याची माहिती मुक्तिपथ चमुला दोनच दिवसांपूर्वी मिळाली. पण कार्यकर्ते येत असल्याचे समजताच या गाळणाºयाने सडवा स्वत:च नष्ट करून पळ काढला. त्यामुळे मुक्तिपथ चमू पोहोचल्यावर त्यांना केवळ रिकामे ड्राम व जमिनीवर सांडलेला सडवा दिसला.

Web Title: Police dare to curb rabbits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस