कार्ड दाखवताच कर्मचाऱ्याला पेट्रोल; सामान्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:20+5:30

रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पेट्रोलच्या वितरणावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्याच कर्मचाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून द्यायचे आहे. संचारबंदीनंतर शासकीय कार्यालयांमध्ये केवळ पाच टक्के कर्मचारी आहेत. सर्वच शाळांना सुटी असल्याने जिल्हा परिषद व इतर शिक्षकांचे अपडाऊन सुध्दा बंद आहे.

Petrol to the employee as soon as the card is shown; Normal run | कार्ड दाखवताच कर्मचाऱ्याला पेट्रोल; सामान्यांची धावपळ

कार्ड दाखवताच कर्मचाऱ्याला पेट्रोल; सामान्यांची धावपळ

Next
ठळक मुद्देप्रमाणपत्रांसाठी गर्दी । अत्यावश्यक सेवेत नसतानाही पेट्रोलची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत सर्वच कर्मचाºयांना ते म्हणतील तेवढे पेट्रोल दिले जात होते. तर दुसरीकडे दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना मात्र प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पेट्रोलच्या वितरणावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्याच कर्मचाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून द्यायचे आहे. संचारबंदीनंतर शासकीय कार्यालयांमध्ये केवळ पाच टक्के कर्मचारी आहेत. सर्वच शाळांना सुटी असल्याने जिल्हा परिषद व इतर शिक्षकांचे अपडाऊन सुध्दा बंद आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना परवानगी शिवाय पेट्रोल देण्याची आवश्यकता नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पेट्रोल पंपावरील गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ सुरूच होती. दुपारी १ वाजतानंतर बाजारपेठ बंद झाल्याने वर्दळ काही प्रमाणात कमी झाली.
मात्र शासकीय कार्यालयाचे ओळखपत्र दाखविल्याबरोबर संबंधित कर्मचाºयाला पाहिजे तेवढे पेट्रोल दिले जात होते. ग्रामीण भागातून शहरी भागात भाजीपाला, दुध आणण्यासाठी दर दिवशी किमान १०० रुपयांचे पेट्रोल संपते. या वर्गाला मात्र तहसीलदारांच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येत होते. तहसील कार्यालय परिसरात गर्दी झाली होती.

पेट्रोलची व्यक्तीनिष्ठ नोंद आवश्यक
अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाºयाला पेट्रोल आवश्यक असेल तर त्याला पेट्रोलशी संबंधित कार्ड द्यावे. या कार्डावर पेट्रोलची नोंद करावी. दुसºया दिवशी किंवा दुसऱ्या पेट्रोल पंपावर संबंधित कर्मचारी गेल्यास त्याला ते कार्ड दाखविणे आवश्यक करावे. यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने नेमके किती पेट्रोल खरेदी केले, हे दिसून येईल. अन्यथा कर्मचाºयांकडूनच पेट्रोलचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पेट्रोलपंप चालकांकडून थातूरमातूर नोंद
कोणत्या व्यक्तीने किती पेट्रोल घेतले, याची पारदर्शकपणे नोंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पेट्रोलपंप चालकांकडून केवळ थातूरमातूर नोंद केली जात असल्याचे लोकमत प्रतिनिधीला दिसून आले. पेट्रोल भरणाऱ्याच्या ओळखीचा व्यक्ती आल्यास त्याला पेट्रोल दिले जात होते. त्याच्या पेट्रोलची नोंद एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावाने केली जात होती. भाजीपाला विक्रेत्यांना पेट्रोल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेऊन पेट्रोल देण्याची शक्कल पेट्रोलपंप चालकांकडून लढविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये भाजीपाला व दुध विक्रेते लुटले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Petrol to the employee as soon as the card is shown; Normal run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.