पेंढरी केंद्रावरील धान भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:18+5:30

दप्तर दिरंगाई व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे केंद्रावरील १० हजार क्विंटलच्या आसपास धानाची उचल झाली. ६ हजार क्विंटलच्यावर धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. परंतु धान झाकण्यासाठी आवश्यक प्रमाणात ताडपत्री मिळाली नाही. तसेच केंद्रावरील कर्मचाºयांचेसुद्धा दुर्लक्ष झाले.

The paddy on the straw center was soaked | पेंढरी केंद्रावरील धान भिजले

पेंढरी केंद्रावरील धान भिजले

Next
ठळक मुद्देदुर्लक्षितपणाचा परिणाम : गोदामाअभावी मोकळ्या जागेत ठेवले; तुटपुंज्या ताडपत्र्या

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी पेंढरीमार्फत महसूल मंडळ व सोसायटीच्या मोकळ्या मैैदानात धान खरेदी करण्यात आली. त्यानंतर तेथेच धान ठेवण्यात आले. पावसाळ्यापूर्वी धानाची उचल करणे आवश्यक होते. परंतु उचल न झाल्याने तुटपुंज्या ताडपत्र्यांअभावी धान भिजले. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पेंढरी येथे पुरेसे गोदाम नसल्याने महसूल मंडळ व सोसायटीच्या मोकळ्या जागेत धान खरेदी करण्यात आली. मागील खरीप हंगामात भरपूर उत्पादन झाल्याने व शासनाने धानाला हमीभाव व बोनस दिल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावरच धानाची विक्री केली. या केंद्रावर धानाची भरपूर आवक झाली. एप्रिल २०२० पर्यंत एकूण १६ हजार ५०० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे चुकारेसुद्धा अदा केले. परंतु खरेदी केलेला धान पावसाळ्यापूर्वी उचलणे आवश्यक होते. दप्तर दिरंगाई व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे केंद्रावरील १० हजार क्विंटलच्या आसपास धानाची उचल झाली. ६ हजार क्विंटलच्यावर धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. परंतु धान झाकण्यासाठी आवश्यक प्रमाणात ताडपत्री मिळाली नाही. तसेच केंद्रावरील कर्मचाºयांचेसुद्धा दुर्लक्ष झाले.
सध्या येथील धान भिजून अंकूर फुटले आहेत. परिसरात दुर्गंधी सुटत असून नागरिकांना त्रास होत आहे. शासनाकडून धानाची खरेदी झाल्यानंतर मानवी चुकांमुळे धानाची नासाडी होते. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. कर्तव्यात हयगय करणाºयांवर कारवाई करावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

दरवर्षी हीच स्थिती
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांमार्फत धानोरा तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या केंद्रांवर आधारभूत किमतीत धानाची खरेदी केली जाते. परंतु पुरेशा गोदामाअभावी धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवले जाते. मोकळ्या जागेत धान ठेवताना योग्य खबरदारी आवश्यक आहे. परंतु याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने दरवर्षी धान भिजण्याची स्थिती निर्माण होते.

Web Title: The paddy on the straw center was soaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस