धान विक्रीचे चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:49+5:30

मोहली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत मोडेभट्टी, मोहली, मेटेजांगदा, सीताटोला, चिंगली, सिनसूर, आस्वलपार, रामपुरी रिठ आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने सध्या तिरंगम हे कारभार पाहत आहेत. या केंद्रांतर्गत आत्तापर्यंत १३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. परंतु अद्यापही ८ ते ९ हजार क्विंटल धानाचे बिल तयार करण्यात आले नाही.

Paddy sale pending | धान विक्रीचे चुकारे प्रलंबित

धान विक्रीचे चुकारे प्रलंबित

Next
ठळक मुद्देमोहली केंद्रावरील प्रकार : एक महिन्यापासून सोसायटीच्या परिसरात धान पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्यातील मोहली येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केली जात आहे. परिसरातील ९ गावातील शेतकऱ्यांनी येथे धान विक्रीसाठी आणला आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून धान खरेदी संथगतीने सुरू आहे. विक्री केलेल्या धानाचेही चुकारे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मोहली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत मोडेभट्टी, मोहली, मेटेजांगदा, सीताटोला, चिंगली, सिनसूर, आस्वलपार, रामपुरी रिठ आदी गावांचा समावेश आहे. परंतु येथील केंद्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने सध्या तिरंगम हे कारभार पाहत आहेत. या केंद्रांतर्गत आत्तापर्यंत १३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. परंतु अद्यापही ८ ते ९ हजार क्विंटल धानाचे बिल तयार करण्यात आले नाही. एक ते दीड महिन्यापासून शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. येथील व्यवस्थापक एल. पी. लेनगुरे यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याने व ते मनमानीपणे कारभार करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. खरेदी केलेल्या धानाची उचल होत नसल्याने इतर शेतकºयांना धान विक्री करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. येथील खरेदी झालेल्या धानासंदर्भात ऑनलाईन काम बरोबर होत नसल्याने हुंडी तयार झाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे चुकारे अडले आहेत. मागील एक महिन्यापासून खरेदी केंद्रावर धान पडून आहे. हजारो क्विंटल धान पडून असतानाही काटा केला जात नाही. काटा करण्यासाठी शेतकºयांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. या संदर्भात आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक तथा जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांची विचारणा केली असता, या खरेदी केंद्राचा कारभार दुसऱ्याकडे सोपविण्यात येईल. सोसायटीत पडलेल्या धानाचे काटे करून बिल बनविले जाईल. हुंड्या तयार करून शेतकºयांना न्याय देण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Paddy sale pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.