वाघाच्या हल्ल्यात एकाच्या मृत्यू; दुसरा झाडावर चढल्याने बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:15 PM2020-04-16T12:15:45+5:302020-04-16T12:16:07+5:30

कोरोनामुळे सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुड्याचे फुल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते.

One dead in a tiger attack; anather one saved his life hrb | वाघाच्या हल्ल्यात एकाच्या मृत्यू; दुसरा झाडावर चढल्याने बचावला

वाघाच्या हल्ल्यात एकाच्या मृत्यू; दुसरा झाडावर चढल्याने बचावला

Next

आरमोरी (गडचिरोली) : कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. सहकाऱ्याने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.


कोरोनामुळे सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुड्याचे फुल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते. त्या दोघांवर झुडपात लपून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यापैकी ज्ञानेश्वर निळकंठ कांबळे (35) हा ठार झाला तर आनंद पांडुरंग सोनकुसरे याने झाडावर चढून आपला जीव वाचविला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या भागातील जंगलात कोणीही जाऊ नये अशी सूचना त्यांनी केली आहे.

Web Title: One dead in a tiger attack; anather one saved his life hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ