जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:27+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

One and a half thousand works of watery shivar are still incomplete | जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

Next
ठळक मुद्देपावसाळ्यामुळे कामे थांबली । चार वर्षात १५ हजार कामे झाली पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ व्हावी, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू केली आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६२ कामे मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ८१७ कामे पूर्ण झाली आहेत. जवळपासा १ हजार ४०० कामे अजूनही शिल्लक आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. एका पाण्याने धान करपते, अशी स्थिती आहे. जंगल असल्याने मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नाही. त्यामुळे सिंचनाची व्यक्तीगत साधने बांधून देण्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात प्राधान्याने कामे मंजूर करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर सुमारे ७० कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये १२२ गावांची निवड झाली. यावर्षी ४ हजार ४२३ कामे मंजूर करण्यात आली. ही सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७७ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
२०१७-१८ मध्ये १६९ गावांची निवड करण्यात आली. ३ हजार ७०३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार ५०७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१८-१९ या वर्षात १७२ गावांची निवड झाली. ४ हजार ५१९ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार २७० कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मधील प्रस्तावित सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. मात्र २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे शिल्लक आहेत.
जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. या अभियानांतर्गत सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: या योजनेचा नियमितपणे आढावा घेत असल्याने या योजनेला निधीची कमतरता भासत नाही. तसेच प्रशासकीय मान्यता व इतरही कामे वेळेवर पार पडतात. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतची कामे इतर योजनांच्या तुलनेत गतीने होत असल्याचे दिसून येते.

अभियान बोड्यांसाठी ठरले वरदान
धानापिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मामा तलाव व बोड्या बांधल्या आहेत. कालपरत्वे या बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. अनेक बोड्यांमध्ये गाळ साचल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या व मामा तलावांच्या पाळी फुटल्याने पाणी राहत नव्हते. त्यामुळे अडचणीच्या वेळी सिंचन न झाल्याने धानपीक करपत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मामा तलाव व बोड्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे अनेक तलाव व बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. शेततळे मात्र निकामी ठरत असल्याचे दिसून येते. ज्या वेळेवर पाऊस राहते, त्याचवेळी शेततळ्यांमध्ये पाणी राहते. पाऊस गेल्यास शेततळे कोरडे पडत असल्याचे चित्र दिसून येते.
 

Web Title: One and a half thousand works of watery shivar are still incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.