कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ३२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:51+5:30

४ नवीन रुग्णांपैकी मुलचेरा तालुक्यातील २ आणि अहेरी तालुक्यातील एक रुग्ण आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथून आले होते आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या संभावित रुग्ण म्हणून १९८० जणांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यापैकी ६६९ जण निरीक्षणाखाली आहेत.

The number of victims of corona has reached 32 | कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ३२ वर

कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ३२ वर

Next
ठळक मुद्दे२७ वर उपचार सुरू : ६३३ नमुन्यांचा अहवाल बाकी, १९८० संभावित रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात शुक्रवारी ४ जणांची अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण लोकांची संख्या आता ३२ झाली आहे. त्यापैकी ५ जणांना सुटी मिळाल्यामुळे उर्वरित २७ जणांवर उपचार सुरू आहेत.
४ नवीन रुग्णांपैकी मुलचेरा तालुक्यातील २ आणि अहेरी तालुक्यातील एक रुग्ण आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथून आले होते आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
सध्या संभावित रुग्ण म्हणून १९८० जणांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यापैकी ६६९ जण निरीक्षणाखाली आहेत.
शुक्रवारी ४५४ जणांना नव्याने संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले. आतापर्यंत घेतलेल्या नमुन्यांपैकी ६३३ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान नवीन रुग्णांसोबत प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ झाली आहे.

दोन डॉक्टरांसह ६० जणांचे नमुने घेतले
एटापल्ली : येथील विलगिकरण कक्षातील १० जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे दहशत पसरली आहे. येथील चार कक्षांमध्ये शिल्लक नागरिकांसह घरी रवाना केलेल्या ९ जणांसह दोन डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांचे मिळून ६० जणांचे नमुने घेण्यात आले. त्यात ३८ पुरूष व २२ महिलांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी येथे अहोरात्र सेवा देत आहेत.

Web Title: The number of victims of corona has reached 32

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.