आगीच्या घटनांमुळे पुंजण्यांची रात्री जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:15 AM2019-11-30T00:15:22+5:302019-11-30T00:15:59+5:30

२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

The night of Punjani awakens due to the fire incident | आगीच्या घटनांमुळे पुंजण्यांची रात्री जागल

आगीच्या घटनांमुळे पुंजण्यांची रात्री जागल

Next
ठळक मुद्देशासनाने मदत देण्याची मागणी : कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची परिसरातील शेतकऱ्यांच्या धान पुंजण्यांना आगी लागत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी पुंजण्यांची रात्रीच्या सुमारास जागल करीत आहेत.
२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कोरची येथून २० किमी अंतरावर असलेल्या चिचगड परिसरातील १०० धानाचे पुंजने जळाल्याची बातमी परिसरात पसरली होती. त्यानंतर कोरची येथील पुंजन्यांना गुरूवारी आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक कुटुंबासह रात्री शेतावर जाऊन जागल करीत आहेत. तालुक्यातील मसेली, बिहीटेकला, वडेगाव, कोरची, भिमपूर, सोहले येथील शेतकरी गस्त घालत आहेत.

कसून शोध घेण्याची गरज
धानाच्या पुंजन्याला आग लागल्यास शेतकऱ्याची संपूर्ण मेहनत वाया जाते. उलट तो कर्जबाजारी होते. यातून सावरण्यासाठी त्याला तीन ते चार वर्षांचा कालावधी लागते. घेतलेले कर्ज फेडणेही कठीण होते. बहुतांश वेळा पुंजन्यांना आगी एखाद्या व्यक्तीमार्फत लावल्या जातात. घटनेबाबतची तक्रार नागरिकांकडून पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर याचा तपास करून आरोपीला कठोर सजा होणे आवश्यक आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकरणांचा कसून शोध घेऊन आरोपींना अटक करणे आवश्यक आहे.

Web Title: The night of Punjani awakens due to the fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.