कट्टर नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; साडेनऊ लाखांचे होते बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:00 PM2020-02-28T15:00:56+5:302020-02-28T15:01:15+5:30

अनेक लहानमोठ्या नक्षली कारवाईत सहभागी असलेल्या विलास कोला (४४) या कट्टर नक्षलवाद्याने शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास धानोरा तालुक्यातील सातगाव येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Naxalite Surrendered in Gadchiroli | कट्टर नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; साडेनऊ लाखांचे होते बक्षीस

कट्टर नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; साडेनऊ लाखांचे होते बक्षीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अनेक लहानमोठ्या नक्षली कारवाईत सहभागी असलेल्या विलास कोला (४४) या कट्टर नक्षलवाद्याने शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास धानोरा तालुक्यातील सातगाव येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यावेळेस त्याने आपली एके ४७ ही रायफलही पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे व अति. पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्या समक्ष हे आत्मसमर्पण करण्यात आले.
नक्षलवादाला व अस्थिर जीवनाला कंटाळलेल्या अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग धरल्याचे अलीकडच्या काळात दिसू लागले आहे. याच मालिकेत शुक्रवारी विलास कोला याने नक्षलवादाचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला. विलास कोला हा अनेक मोठ्या नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला होता. त्याला पकडून देण्यासाठी ९,५०,००० चे बक्षीसही सरकारने घोषित केले होते.

Web Title: Naxalite Surrendered in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.