सीएए विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:16+5:30

फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला निंदणीय असून या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, तसेच सीएए कायदा रद्द करावा, अशी मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केली.

Movement against CAA | सीएए विरोधात आंदोलन

सीएए विरोधात आंदोलन

Next
ठळक मुद्देदेसाईगंजात धरणे : एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक मंजूर करू नये तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी आदी मागण्यांसाठी देसाईगंज येथील फवारा चौकात अनेक राजकीय पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
फवारा चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली तसेच जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. सीएए कायदा रद्द करावा तसेच एनआरसी विधेयक पारित करू नये. सीएए विरोधात दिल्ली येथील जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला निंदणीय असून या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करावी, तसेच सीएए कायदा रद्द करावा, अशी मागणीही विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केली. जवळपास २ तास धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ रिझवी, रोहिदास राऊत, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष इलियास खान, कम्युनिस्ट पार्टीचे अमोल मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष लतीफ शेख, वंचित बहुजन आघाडीचे डाकराम वाघमारे, रिपब्लिकन फोरमचे योगेश टेंभूर्णे, आरती लाहेरी, आमिर यासीनी, कैैलास बगमारे, जुनेद शेख, बीआरएसपीचे राज बन्सोड तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. अनुचित घटना टाळण्यासाठी आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Movement against CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.