शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:35+5:30

शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

Most hit on farmers, farm laborers | शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

शेतकरी, शेतमजुरांना सर्वाधिक फटका

googlenewsNext
ठळक मुद्देअर्थसाहाय्य व कर्ज पुरवठ्याची मागणी : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक नियोजन कोलमडले

रत्नाकर बोमिडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. यात शहराबरोबरच खेडेही भरडल्या जात आहेत. कोरोनाचा फटका उद्योगाला बसला. परंतु ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.
शेतमालाची खरेदी बंद असल्यासारखी आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांजवळचे पैसे संपत आल्याने दैनंदिन गरजा व औषधोपचारावर होणारा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शेतकरी व शेतमजुरांसमोर निर्माण झाला आहे. शेतीची इतर कामेही करणे बंद झाले आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तालुक्यातील शेतकरी खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात पीक घेतले जाते. मात्र आता कोरोनाच्या संचारबंदीने शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राहावे लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाही तर दुसरीकडे काम करता येत नाही, अशा द्विधा अवस्थेत शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांचे आर्थिक नियोजन ढेपाळले आहे.
अनेक ठिकाणी कापणीला आलेले कडधान्य तसेच शेवटचा तोडा असलेल्या कापसाची वेचणी केव्हा होईल, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशावेळी शासन व स्वयंसेवी संस्था त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. परंतु केवळ जीवनावश्यक वस्तू पुरवून उपयोग नाही तर त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करणे गजेचे आहे. शेतकºयांची कर्जमाफी झाली की नाही, शेतकऱ्यांना तातडीने व पुरेसा कर्जपुरवठा होतो की नाही? शेतकºयाला शेतीपयोगी वस्तू रास्त भावात उपलब्ध होतात की नाही या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कर्मचारी कोरोनाविरोधात लढत असताना त्यांनी शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे अश्रू पुसणे तितकेच महत्त्वाचे आहे. देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अर्थ पुरवठा न झाल्यास लॉकडाऊन थांबल्यावर शेतकरी, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कोसळून पडल्याशिवाय राहणार नाही.

लघु व्यावसायिक व अत्यल्प मानधनावर असणाºयांचे होणार बेहाल
चामोर्शी, गडचिरोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी असलेल्या दुकानांमध्ये अत्यल्प मानधनावर बरेच युवक काम करतात. अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी ५० हजार ते १ लाख रुपयांचे भांडवल उभारून छोटे व्यवसाय उभे केले आहेत. कोणी भाड्याची खोली घेऊन, दुकानचाळीत तर कुणी ठेला लावून विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे दुकान थाटले आहेत. मात्र कोरोना संचारबंदीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून किराणा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णत: ठप्प पडले आहेत. डेकोरेशन, फुलवारी व इतर व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायात काम करणारे मजूर व मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Most hit on farmers, farm laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी