अर्ध्याअधिक ई-पासचे अर्ज नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:01:04+5:30

२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.

More than half e-pass applications rejected | अर्ध्याअधिक ई-पासचे अर्ज नामंजूर

अर्ध्याअधिक ई-पासचे अर्ज नामंजूर

Next
ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरील प्रवास झाला कठीण : आतापर्यंत २८०७ जणांना परवानगी, २८९९ जणांना नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तिसऱ्या लॉकडाऊनंतर ग्रिन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अंतर्गत प्रवासी वाहतूक आणि नंतर सर्व दुकाने उघडून व्यवहार सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. परंतू जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी विशिष्ट कारणासाठीच दिली जात असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने २८०९ लोकांना जिल्ह्याबाहेर जाऊन परत येण्यासाठी ई-पास दिली. २८९९ लोकांना मात्र पास नामंजूर केली. अजून २९ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.
२४५४ जणांना पास मंजूर झाली होती, पण त्याचा लाभ घेण्याआधीच पासची वैधता संपल्यामुळे ती पास त्यांच्यासाठी कुचकामी ठरली. केवळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या कारणासाठी किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तरच जिल्ह्याबाहेर जाऊन येण्यासाठी पास मंजूर केली जात आहे. इतर कारणांसाठी पास दिली जात नसल्यामुळे नामंजूर होण्याचे प्रमाण जास्त आहे.
इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले असल्यास त्यांना येथून जाण्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज असते. ती परवानगी मिळण्यात अडचणी नाही. परंतू नोकरी, व्यवसायानिमित्त इतर राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी घेताना थोड्या अडचणी जात आहेत.
विशेष म्हणजे रेड झोनमधून येणाºयांना आता गुरूवारपासून (दि.१४) संस्थात्मक विलगिकरणात (इन्स्टिट्युशनल क्वॉरंटाईन) राहणे आणि त्यांची स्वॅब टेस्ट करणे जिल्हाधिकाºयांनी आवश्यक केले आहे. ही अट मान्य असेल तरच जिल्ह्यात येण्याची परवानगी दिली जात असल्यामुळे अनेकांसाठी ही बाब अडचणीची ठरत आहे. आम्ही होम क्वॉरंटाईन ठेवतो असे सांगून अनेक जण प्रशासकीय यंत्रणेला गळ घात आहेत.
पण होम क्वॉरंटाईन ठेवणे जोखमीचे ठरू शकत असल्यामुळे त्याला परवानगी देण्यास प्रशासन तयार नाही. संस्थात्मक विलगिकरणात असताना चाचणी अहवाल जर निगेटिव्ह आला तर घरी विलगिकरणात राहण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, असे एका अधिकाºयाने सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पाळीत ड्युटी
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश यंत्रणा कोविड-१९ च्या कामातच गुंतलेली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना वेगवेगळ्या जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. ई-पासेस मंजूर-नामंजूर करण्यापासून तर येणाºया-जाणाºया लोकांसाठी मोफत एसटी बसेस, रेल्वे तिकीटची व्यवस्था करणे, विलगिकरणातील नागरिकांची नोंद आणि इतर अनेक जबाबदाºया सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री १० अशी दोन पाळीत अधिकारी-कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे.

३७ लोकांचा अहवाल बाकी
आतापर्यंत कोरोनाच्या संशयित २९६ रुग्णांपैकी २६१ रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२४ जणांची चाचणी निगेटीव्ह आली असून ३७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे. त्या ३७ लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार ९७३ प्रवासी आले आहेत. त्यांच्यापैकी २५ हजार ८६० लोकांनी घरी क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला. सध्या १२ हजार ७३९ नागरिक आपापल्या घरी क्वॉरंटाईन तर ६ हजार ३७४ नागरिक विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन आहेत.

Web Title: More than half e-pass applications rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.