१९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 07:46 PM2020-01-07T19:46:19+5:302020-01-07T19:46:23+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी १५३९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकाची लागवड होते.

The money in 194 villages is less than 50 paisa | १९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

१९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

Next

गडचिरोली : महसूल विभागाने खरीप हंगामा २०१९-२० ची अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी तर १२९८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचा अहवाल दिला आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी १५३९ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकाची लागवड होते. यावर्षी त्यातील १४९२ गावांमध्ये पिकांची लागवड झाली होती. त्यापैकी केवळ १९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे तीच गावे दुष्काळसदृश ठरवून शासनाच्या सवलती व मदतीसाठी पात्र ठरू शकतील.

यावर्षी अतिवृष्टी आणि नंतर अवकाळी पावसाचा खरीपातील पिकांना फटका बसला आहे.  तरीही जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे.

Web Title: The money in 194 villages is less than 50 paisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.