उघड्यावरील धानावर मोकाट जनावरांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:23+5:30

महामंडळाच्या आरमोरी येथील उप्रप्रादेशिक कार्यालयांतर्गत विहिरगाव येथे आविका संस्थेतर्फे आधारभूत खरेदी केंद्रावर खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र धान खरेदीच्या व्यवहारात झालेल्या चुकांमुळे येथील व्यवस्थापकाकडून केंद्राचा भार काढून घेण्यात आला. विहिरगाव येथे नवीन व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली नाही.

Mokat animal herd on open grain | उघड्यावरील धानावर मोकाट जनावरांचा डल्ला

उघड्यावरील धानावर मोकाट जनावरांचा डल्ला

Next
ठळक मुद्देविहिरगाव केंद्राच्या परिसरातील स्थिती : आदिवासी विकास महामंडळासह विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील आधारभूत धान खरेदी केंद्राच्या परिसरात खरेदी केलेले धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहेत. या धानावर मोकाट जनावरे डल्ला मारत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे महामंडळासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.
महामंडळाच्या आरमोरी येथील उप्रप्रादेशिक कार्यालयांतर्गत विहिरगाव येथे आविका संस्थेतर्फे आधारभूत खरेदी केंद्रावर खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यात आली. मात्र धान खरेदीच्या व्यवहारात झालेल्या चुकांमुळे येथील व्यवस्थापकाकडून केंद्राचा भार काढून घेण्यात आला. विहिरगाव येथे नवीन व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या धानाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. विहिरगाव येथील केंद्रावर सन २०१९-२० या वर्षातील जवळपास ७ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ते धान अस्ताव्यस्थ स्थितीत पडून आहेत.
महामंडळाच्या वतीने पुरेशी ताडपत्री पुरविण्यात आली नाही. तसेच दिवसा व रात्री देखभालीसाठी चौकीदारही नाही. त्यामुळे उघड्यावरील धानाची मोकाट जनावरे नासाडी करीत आहेत. तसेच रात्रीच्या सुमारास भुरट्या चोरांकडूनही धान लंपास करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाने नुकसान होणार
जून महिन्यात केव्हाही दमदार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी विहिरगाव येथील धानाची उचल करून विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. तशी कार्यवाही न झाल्यास पावसाने धान भिजून आविका संस्थेसह नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Mokat animal herd on open grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.