Milk processing is profitable for the industry | दुधावरील प्रक्रिया उद्योग नफ्याचा
दुधावरील प्रक्रिया उद्योग नफ्याचा

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : माविमतर्फे वसा येथे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या बचत गटातील महिलांनी दुग्ध उत्पदानातून विविध वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. या वस्तूंचा व्यापार करून सहकार तत्वावर विक्री केल्यास अधिक नफा मिळेल, तसेच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालय, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ व सखी लोकसंचालित साधन केंद्र गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वसा येथे १४ ते १५ जून दरम्यान दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर उद्घाटक म्हणून वसाच्या सरपंच मंगला भोयर, उपसरपंच शंकर इंगळे, न्या. कांबळे, माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके, राजू भुसारी, कृषी विभागाच्या उपसंचालक प्रिती हिरळकर, मोहन घनोटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. गुणवंत भडके, कांता मिश्रा यांनी दुग्ध व्यवसाय याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. याप्रसंगी तेजस्विनी वैनगंगा महिला उत्पादक सहकारी संस्थेची यशोगाथा सादर करण्यात आली. प्रास्ताविक सचिन यादव, संचालन कुंदा मामिडवार यांनी केले.


Web Title: Milk processing is profitable for the industry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.