डॉक्टरांअभावी ओस पडली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:29+5:30

लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रु ग्णालयांमध्ये रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, पण कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतू तरीही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आढळली.

Many hospitals in the district became dehydrated due to lack of doctors | डॉक्टरांअभावी ओस पडली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये

डॉक्टरांअभावी ओस पडली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये

Next
ठळक मुद्देढिसाळ नियोजन । उच्च न्यायालयाच्या आरोग्य समितीच्या तपासणीत आरोग्य सेवेचे पितळ उघडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/कोरची : कोरची तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची पदेच भरलेली नाहीत. जिथे आहेत तिथेही डॉक्टर हजर राहात नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वत्र बिकट परिस्थिती असल्याची वास्तविकता उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निदर्शनास आली. या समितीने दि.२२ रोजी काही आरोग्य संस्थांना भेटी दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
डॉ.सतीश गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत डॉ.मनोहर मुद्देशवार आणि सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.फुलचंद मेश्राम यांचा समावेश आहे. त्यांनी कोरची तालुक्यातील ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच गडचिरोलीत जिल्हा सामान्य रुग्णालयाला अनपेक्षित भेटी देऊन पाहणी केली.
दीनानाथ वाघमारे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील कमतरतेसंबंधी याचिका दाखल केली होती. त्यावर शासनातर्फे सर्वकाही ठीक असल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने वरील तीन सदस्यांची नियुक्ती केली. त्यांनी दि.२२ रोजी ग्रामीण रु ग्णालय कोरची आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा येथे भेट दिली.
कोरची ग्रामीण रु ग्णालयात साफसफाई नव्हती. हजारो रु पये खर्च करून सोलर युनिट खरेदी केले पण ते उपयोगाविनाच पडून असल्याचे दिसून आले. दोनच डॉक्टर ग्रामीण रु ग्णालयाचा भार सांभाळत होते. औषधांची कमतरताही आढळली. लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रु ग्णालयांमध्ये रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, पण कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतू तरीही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आढळली. त्यासाठी शिफारस करणार असल्याचे डॉ.गोगुलवार यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा येथे एकही डॉक्टर हजर नव्हते. त्यांनी केंद्राची संपूर्ण तपासणी केली त्यात बाह्यरु ग्ण वॉर्डमध्ये कॅरम बोर्ड लावलेला होता. प्रसुती वॉर्ड कुलूपबंद होते. वॉर्डमध्ये धूळ साचलेली होती. शासनाच्या विविध योजनांचे शिबिर या प्राथमिक आरोग्य केंद्रात होतात का यावरही समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी काम करीत नसल्याने ग्रामीण रुग्णालयावर ताण येतो.

बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र कुचकामी
बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राला ९३ गावे जोडलेली आहेत. पण तरीही रुग्णांची संख्या नगण्य होती. हे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरचीवरून बोटेकसा येथे स्थलांतरित झाल्यापासून फक्त दोन महिलांच्या प्रस्तुती करण्यात आल्या आहेत. शासनाने लाखो रु पये खर्च करून बांधकाम केलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत केवळ कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठीच उपयोगात येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची आजपर्यंत एकही शस्त्रक्रि या करण्यात आली नाही. त्यामुळे या आरोग्य केंद्रात नियुक्त डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवरील खर्च निरर्थक तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली.

जिल्हा रुग्णालयात
सिटी स्कॅन सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून सिटी स्कॅन मशिन बंद आहे. आता नवीन मशिन लावण्यात आली आहे. या मशिनचे उद्घाटन होणे बाकी आहे, पण त्यासाठी रुग्णांची तपासणी थांबविली नसून रुग्णांचे सिटी स्कॅन सुरू झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सदर समितीला दिली असल्याचे डॉ.गोगुलवार यांनी सांगितले.

Web Title: Many hospitals in the district became dehydrated due to lack of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.