जेसीबीच्या दणक्याने पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:28+5:30

चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विरूद्ध बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार होत असून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान येथे यंत्राच्या सहाय्याने गतीने खोदकाम सुरू आहे. रस्त्यालगतच्या फुटपाथ दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढले. नाक्यापासून ते राधे बिल्डींगपर्यंत रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून दुभाजकावर वाहनधारकांसाठी हिरवी जाळी लावण्यात आली आहे.

JCB breaks pipeline | जेसीबीच्या दणक्याने पाईपलाईन फुटली

जेसीबीच्या दणक्याने पाईपलाईन फुटली

googlenewsNext
ठळक मुद्देचामोर्शी रोडवर महामार्गाचे काम : आशीर्वाद नगरातील पाणीपुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावर राष्ट्रीय महामार्गासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. येथे दिवसा व रात्री जेसीबीच्या सहाय्याने झपाट्याने खोदकाम केले जात आहे. यादरम्यान मंगळवारच्या रात्री भूमिगत नळ पाईपलाईन फुटल्याने शेकडो लीटर पाण्याचा अपव्यय झाला.
चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विरूद्ध बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग तयार होत असून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान येथे यंत्राच्या सहाय्याने गतीने खोदकाम सुरू आहे.
रस्त्यालगतच्या फुटपाथ दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढले. नाक्यापासून ते राधे बिल्डींगपर्यंत रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून दुभाजकावर वाहनधारकांसाठी हिरवी जाळी लावण्यात आली आहे. खोदकामादरम्यान बिल्ट आॅफिससमोरील नळ पाईप लाईन फुटली. परिणामी खोदकाम झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. खोदकाम झाल्याने लगतच्या आशीर्वाद नगरातील काही घरांचा नळ पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. खोदकामामुळे या मार्गावर धुळीचे प्रमाण वाढले असून वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. एकावेळेस अधिकाधिक चारचाकी वाहने आल्यावर या मार्गावरील वाहतूक प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: JCB breaks pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी