सात लाख रुपयांचा गुळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:55+5:30

ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा पोलिसांमार्फत सुरू होती. एमएच ४०, एके ५९५३ क्रमांकाच्या ट्रकने गुळाची वाहतूक करण्यात आली.

Jaggery worth Rs 7 lakh seized | सात लाख रुपयांचा गुळ जप्त

सात लाख रुपयांचा गुळ जप्त

Next
ठळक मुद्दे९०० पेट्या ताब्यात : आलापल्ली, मुलचेरा, सुंदरनगरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली/मुलचेरा : गोपनिय माहितीच्या आधारे मुलचेरा पोलिसांनी किराणा दुकानांवर तसेच अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथील एका नागरिकाच्या घरी धाड टाकून जवळपास ९०० पेट्या गुळ जप्त केला आहे.
ट्रकने गुळ आणून तो सुंदरनगर येथील दुकानांमध्ये उतरविला जात असल्याची गोपनिय माहिती मुलचेरा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी सुंदरनगर गाठले असता, एका दुकानात गुळ उतरविला जात असल्याचे दिसून आले. तसेच ट्रक चालकाकडे असलेल्या यादीवरून सदर गुळ सुंदरनगर येथील शहा किराणा, गणेश किराणा, मथुरानगर येथील विकास किराणा, मित्र किराणा, कोपरअल्ली येथील श्रुती किराणा, मुलचेरा येथील मोती किराणा येथे गुळ उतरविला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार या दुकानांची तपासणी केली असता, या दुकानांमध्ये जवळपास ८०० पेट्या गुळ आढळून आला. एका पेटीत २० किलो गुळ राहते. या २० किलो गुळाची किंमत ७५० रुपये एवढी होते. संपूर्ण ट्रकमध्ये जवळपास ६०० ते ६५० पेट्या गुळ वाहून नेता येते. ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा पोलिसांमार्फत सुरू होती. एमएच ४०, एके ५९५३ क्रमांकाच्या ट्रकने गुळाची वाहतूक करण्यात आली. या ट्रकवर श्रीकृष्ण रोडवेज चामोर्शी व न्यू जीवानी रोडवेज गडचिरोली असे लिहिले आहे.
सदर कारवाई मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक, पोलीस उपनिरिक्षक एम. पी. नैताम, सहायक पोलीस उपनिरिक्षक विनायक किरंगे, नाईक पोलीस देवेंद्र बांबोळे, प्रमोद गौरकार यांच्या पथकाने केली.

आलापल्ली येथे आढळला ९४ पेट्या गुळ
आलापल्ली : येथील स्वामी सारकेवार याच्या घरी मोठ्या प्रमाणात गुळ साठविला असल्याची माहिती मुक्तीपथ चमुने अहेरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, त्यामध्ये ९४ पेटी गुळ आढळून आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुळाचा वापर दारू काढण्यासाठी केला जाते. त्यामुळे पोलिसांनी सारकेवार याच्या विरूध्दात गुन्हा दाखल करून गुळ ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या गुळाची किंमत १ लाख २५ हजार ९५० रुपये एवढी होते. आलापल्ली येथे ट्रकच्या सहाय्याने गुळ उतरवून सदर गुळ अहेरी, सिरोंचा तालुक्यातील दारू काढणाऱ्या व्यक्तींना पुरविला जाते. सदर कारवाई पोलीस निरिक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विनायक पाटील, ए. आर. नरोटे, मुक्तीपथ संघटक केशव चव्हाण, मारोती कोलावार यांनी केली.

Web Title: Jaggery worth Rs 7 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस