अहेरी तालुक्यात अवैध धंदे जोमात, पोलीस यंत्रणा कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 02:03 PM2021-10-18T14:03:50+5:302021-10-18T14:31:25+5:30

काेंबडा बाजारात काेंबड्यांची शर्यत लावण्याबराेबरच लाखाे रुपयांचा जुगार खेळला जात आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे जुगारासह अनेक अवैध धंदे येथे सुरू असून अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत.

Illegal gambling dens and cockfights in gadchiroli | अहेरी तालुक्यात अवैध धंदे जोमात, पोलीस यंत्रणा कोमात

अहेरी तालुक्यात अवैध धंदे जोमात, पोलीस यंत्रणा कोमात

googlenewsNext
ठळक मुद्देकोंबडा बाजारात लाखाेंचा जुगार, पाेलिसांचे दुर्लक्ष रेपनपल्ली पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंद्यांना ऊतआलापल्ली ते सिरोंचा रस्त्यावरील गावांत तस्करांची नजर

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे दर रविवारी व राजाराम खांदला येथे दर गुरुवारी मागील काही दिवसांपासून अवैध कोंबडा बाजार मोठ्या जोमाने सुरू आहे. याठिकाणी परिसरातील शेकडो नागरिक कोंबडा बाजारात जुगार खेळत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मात्र, याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

कोंबडा बाजारावर जिल्ह्यात सर्वत्र बंदी घालण्यात आली आहे. असे असतानासुद्धा बेधडकपणे काेंबडा बाजार भरविला जात आहे. छल्लेवाडा हे गाव रेपनपल्ली उप पाेलीस ठाण्यांतर्गत येते. तर, राजाराम खांदला येथेच उपपाेलीस ठाणे आहे. दाेन्ही काेंबडा बाजारात काेंबड्यांची शर्यत लावण्याबराेबरच लाखाे रुपयांचा जुगार खेळला जात असून पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे जुगारासह अनेक अवैध धंदे येथे जोरात सुरू आहेत. 

या परिसरात देशी-विदेशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. काेंबडा बाजार भरत असताना स्थानिक पाेलिसांच्या ही बाब लक्षात नाही काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी या ठिकाणी कोंबडा बाजार सुरू असताना नक्षल्यांनी एका एसपीओची हत्या करून त्याची दुचाकी जाळली होती, हे विशेष.

Web Title: Illegal gambling dens and cockfights in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.