गोरखनाथ समाजबांधवांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:42+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळा मार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू उभारून आपला बिऱ्हाड थाटला. मणी, डोरले, बिऱ्या आदींची विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

Hands of help to the Gorakhnath community | गोरखनाथ समाजबांधवांना मदतीचा हात

गोरखनाथ समाजबांधवांना मदतीचा हात

googlenewsNext
ठळक मुद्दे४० कुटुंबांना लाभ : माजी पं.स. सदस्याकडून गहू, तांदूळ व डाळीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/भेंडाळा : बेंटेक्सच्या वस्तू विकणे, कुकर दुरूस्ती करणे, झाडू बनवून विक्री करणे आदी कामे करून उपजीविका करणारे गोरखनाथ समाजबांधव भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयाजवळच्या मोकळ्या जागेत गेल्या १५ दिवसांपासून वास्तव्य करीत आहेत. परंतु संचारबंदी लागू झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यांची ही गरज ओळखून माजी पं. स. सदस्य प्रमोद भगत यांनी पुढाकार घेऊन जवळपास ४० कुटुंबाला गहू, तांदूळ, डाळ आदी धान्याचे वितरण गुरूवारी केले.
यवतमाळ जिल्ह्यातील खापरी, पिंपळशेंडा, करणवाडी आदी गावातील गोरखनाथ समाजबांधव दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात विविध फिरता व्यवसाय करण्याकरिता येतात. १५ दिवसांपूर्वी भटक्या जमातीचे हे ४० कुटुंब चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे आले. रामाळा मार्गालगतच्या मोकळ्या जागेत तंबू उभारून आपला बिऱ्हाड थाटला. मणी, डोरले, बिऱ्या आदींची विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु देशासह राज्यात संचारबंदी आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे त्यांना स्वगावी जाणे शक्य नाही. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून जून महिन्यापर्यंत अस्थायी स्वरूपात परजिल्ह्यात वास्तव्य करून नागरिक किरकोळ व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. त्यानंतर संपूर्ण पावसाळाभर स्वगावी राहतात.
१५ दिवसांपासून गोरखनाथ समाजबांधव भेंडाळा येथे वास्तव्य करीत आहेत. सुरूवातीला नागरिकांचा व्यवसाय जोमात होता. परंतु संचारबंदी लागू झाल्यानंतर व्यवसाय मंद झाला. सध्या नागरिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी प्रमोद भगत यांनी स्वत:कडील तांदूळ, गहू, डाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. त्यामुळे गोरखनाथ समाजबांधवांच्या चेहºयावर हास्य उमलले.

Web Title: Hands of help to the Gorakhnath community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.