कोसळल्याने अर्धे धान अपरिपक्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:49+5:30

आष्टी परिसरात प्रामुख्याने जड धानाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी मध्यम कालावधीच्याही धानाची लागवड करतात. जड धान नेमके निसवले असताना अवकाळी पावसाचा जोर वादळ वाऱ्यासह वाढला. त्यामुळे धान जमिनीवर कोसळले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. धानाचे लोंब पाण्यात असल्याने ते खराब झाले आहेत. मध्यम प्रतीच्या धानाची कापणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Half paddy immature due to collapse | कोसळल्याने अर्धे धान अपरिपक्व

कोसळल्याने अर्धे धान अपरिपक्व

Next
ठळक मुद्देउत्पादनात होणार घट । नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान कोसळले आहे. कोसळलेल्या धानाचे अर्धे लोंब परिपक्व आहेत. तर अर्धे लोंब परिपक्व झाले नाही. यामुळे मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आष्टी परिसरात प्रामुख्याने जड धानाचे उत्पादन घेतले जाते. काही शेतकरी मध्यम कालावधीच्याही धानाची लागवड करतात. जड धान नेमके निसवले असताना अवकाळी पावसाचा जोर वादळ वाऱ्यासह वाढला. त्यामुळे धान जमिनीवर कोसळले. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. धानाचे लोंब पाण्यात असल्याने ते खराब झाले आहेत. मध्यम प्रतीच्या धानाची कापणी शेतकऱ्यांनी केली आहे. सदर धान मळून झाल्यानंतर वाळवावे लागत आहे. धान काळे पडले असल्याने या धानाला कमी भाव मिळणार आहे. आष्टी येथील आलापल्ली मसाहत येथील चोखाजी उंदीरवाडे यांची एक एकरातील धानपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. उंदीरवाडे यांच्याकडे दोन एकर जागा आहे. त्यात जयश्रीराम व एचएमटी धानाची लागवड केली आहे. जवळपास एका एकरातील धान कोसळल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांनी २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. सदर कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकºयासमोर निर्माण झाले आहे. आष्टी परिसरातील शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले आहे. प्रशासन, तलाठी, कृषी सहायक पंचनामे करीत आहेत. पंचनामे केल्यानंतर शासनाने प्रती एकरी किमान १५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. अजुनही काही परिसरात पंचनामे करणे सुरूच असल्याने प्रत्यक्ष मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

Web Title: Half paddy immature due to collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती