जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात पोलीस दलास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:47 PM2022-01-14T18:47:36+5:302022-01-14T18:49:47+5:30

Gadchiroli News पोलीस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा या भागात शुक्रवारी जहाल नक्षलवादी करण उर्फ दुलसा पेका नरोटे याला विशेष पथक अभियान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी अटक केली. 

Gadchiroli police arrest Naxalite Karan alias Dulsa Narote | जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात पोलीस दलास यश

जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात पोलीस दलास यश

googlenewsNext
ठळक मुद्दे    शासनाने जाहीर केले होते २ लाख रूपयांचे बक्षीस.गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई

    
गडचिरोली: पोलीस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा या भागात शुक्रवारी जहाल नक्षलवादी करण उर्फ दुलसा पेका नरोटे याला विशेष पथक अभियान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी अटक केली. 

नक्षली चळवळीचे संवेदनशील केंद्र मानल्या जात असलेल्या गोरगुट्टा येथे राहणारा करण उर्फ दुलसा पेका  नरोटे हा प्लाटून क्र. १४ च्या सशस्त्र दलममध्ये होता. तसेच तो गट्टा दलमचा सदस्य व अॅक्शन टीमचा सदस्य होता.

 २००८ साली भामरागडमध्ये दोबूर जंगलात झालेल्या चकमकीत व राजू धुर्वा याच्या खुनात त्याचा सहभाग होता. तसेच अनेक चकमकी, ट्रक जाळपोळ प्रकरणातही त्याचा हात होता. जिल्ह्यातील विविध हिंसक घटनांमध्ये सहभागी  असलेल्या करणवर १६ गुन्हे दाखल असून त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा.यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.अपर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री.सोमय मुंडे सा.मा.अपर पोलिस अधिक्षक(प्रशासन) श्री.समीर शेख सा.मा.अपर पोलिस अधीक्षक श्री.अनुज तारे सा.यांच्या नेतृत्वात पार पडले.मा.पो.अधिक्षक सा.यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Gadchiroli police arrest Naxalite Karan alias Dulsa Narote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.