गडचिरोली नगर पालिकेची कर वसुली पोहोचली ६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:38+5:30

शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व पाणी करासोबतच मालमत्ताधारकांवर वृक्षकर, शिक्षण उपकर, रोहयो उपकर, उपभोक्ता शुल्क आदी प्रकारचे कर लावते. या कराची सुद्धा पालिकेच्या वतीने वसुली करण्यात आली.

Gadchiroli municipality's tax collection reaches 60% | गडचिरोली नगर पालिकेची कर वसुली पोहोचली ६० टक्क्यांवर

गडचिरोली नगर पालिकेची कर वसुली पोहोचली ६० टक्क्यांवर

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे माघारली । दीड कोटीचे गृहकर व ६९ लाख ४३ हजार पाणी कराची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांकडून गृह व पाणी कराची वसुली करण्यात आली. ३१ मार्च २०२० पर्यंत पालिकेच्या पथकाने सर्वप्रकारचे कर मिळून सरासरी ६० टक्के वसुली केली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे यंदा पालिकेची कर वसुली माघारली आहे.
गडचिरोली नगर पालिकेची थकीत व चालू वर्षाची मिळून २ कोटी ६८ लाख १७ हजार ४८० रुपये इतकी गृहकराची मागणी होती. यापैकी १ कोटी ४९ लाख ८६ हजार ३१६ रुपये इतकी गृहकराची वसुली झाली आहे. याची टक्केवारी ५५.८८ आहे. शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे.
नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व पाणी करासोबतच मालमत्ताधारकांवर वृक्षकर, शिक्षण उपकर, रोहयो उपकर, उपभोक्ता शुल्क आदी प्रकारचे कर लावते. या कराची सुद्धा पालिकेच्या वतीने वसुली करण्यात आली.
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ३१ मार्चपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी मालमत्ताधारकांकडून कर वसुली करून याची टक्केवारी ९० पेक्षा अधिक ठेवावी, असे निर्देश शासनाचे प्रशासनाला असतात. कर वसुलीचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कसोसीचे प्रयत्न केले जातात. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून मार्च महिन्यातच जोरदार कर वसुली करून उद्दिष्ट पूर्ण केले जाते. मात्र मार्च महिन्यातच कोरोनारूपी संकट देशावर ओढावल्याने कर वसुलीचे काम थंडावले.
नगर परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कर भरणाऱ्यांची संख्या रोडावली होती. पालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी पथक गठित करण्यात आले होते. यामध्ये आठ ते नऊ कर्मचारी समाविष्ट होते. सकाळी व सायंकाळच्या सुमारास वॉर्डावॉर्डात फिरून या पथकातील कर्मचाºयांनी गृह व पाणीकराची वसुली केली. कोरोनामुळे गडचिरोली नगर पालिकेसोबतच आरमोरी, देसाईगंज पालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगर पंचायती यावर्षी कर वसुलीत माघारले असल्याचे दिसून येते.

शासनाकडून शिथिलता
नगर परिषद, ग्रामपंचायत कर्मचाºयांनी कर वसुली करावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र ३१ मार्चपर्यंतच १०० टक्के वसुली झाली पाहिजे, असे बंधन कोरोनामुळे ठेवण्यात आले नाही. कर वसुलीसाठी शासनाने शिथीलता दिल्यामुळे कर्मचाºयांना त्रास झाला नाही.

Web Title: Gadchiroli municipality's tax collection reaches 60%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.