गाेंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी दरवर्षी २५ काेटींचा निधी उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 05:00 AM2021-10-04T05:00:00+5:302021-10-04T05:00:29+5:30

आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज विद्यापीठाचा भाग झालेला असेल असे ते यावेळी म्हणाले.  गडचिरोली व चंद्रपूरमधील मुलांमध्ये गुणवत्ता चांगली असून, त्या गुणवत्तेला ओळखून विद्यार्थ्यांना कशात आवड आहे, त्यानुसार त्यांना क्षेत्र निवडायची संधी हवी, अशा सूचना यावेळी त्यांनी  विद्यापीठाला केल्या. 

Funds of Rs. 25 crore will be provided every year for the development of Gandwana University | गाेंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी दरवर्षी २५ काेटींचा निधी उपलब्ध करणार

गाेंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी दरवर्षी २५ काेटींचा निधी उपलब्ध करणार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी जिथे जिथे अडचणी आल्या, त्या ठिकाणी जेवढे शक्य झाले तेवढे आपण सहकार्य केले. विद्यापीठाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत आपण खारीचा वाटा उचलला. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी दरवर्षी शासनाकडून किमान २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणार, अशी ग्वाही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
गोंडवाना विद्यापीठाच्या दशमानोत्सव कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ना. विजय वडेट्टीवार व महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ना. वडेट्टीवार बाेलत हाेते. 
यावेळी मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे डॉ. निपुण विनायक, संस्थापक अध्यक्ष ज्ञान फाऊंडेशन, नागपूरचे अजिंक्य कोत्तावार, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील डॉ. राजेंद्र कुंभार, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ मेश्राम, माजी आमदार डाॅ. नामदेवराव ऊसेंडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, व्यवस्थापन परिषदेचे व अधिसभेचे सदस्य, प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे आणि रुसाचे कन्सल्टंट डॉ. प्रमोद प्राभदेकर आदी उपस्थित होते.
पुढे बाेलताना  ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, दुर्गम, मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आधी उच्च शिक्षणाची संधी नव्हती. आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज विद्यापीठाचा भाग झालेला असेल असे ते यावेळी म्हणाले.  गडचिरोली व चंद्रपूरमधील मुलांमध्ये गुणवत्ता चांगली असून, त्या गुणवत्तेला ओळखून विद्यार्थ्यांना कशात आवड आहे, त्यानुसार त्यांना क्षेत्र निवडायची संधी हवी, अशा सूचना यावेळी त्यांनी  विद्यापीठाला केल्या. 
विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी आपल्या प्रास्ताविकात येथील युवावर्ग खूप सकारात्मक असून, विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांना इतरांपेक्षा वेगळे करण्याची संधी दिली जात असल्याचे सांगितले. गोंडवाना विद्यापीठाला इतरांबरोबर स्पर्धा करायची नसून गोंडवाना विद्यापीठ एक ब्रँड बनायला पाहिजे. या विद्यापीठात मुलांना कौशल्यप्रधान व्हायला हवे, ज्यामुळे येथील विद्यार्थी काही नवीन करु शकतील. तसेच विद्यापीठाने तसे नियोजनही करण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.  उपस्थितांचे आभार कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे यांनी मानले.

खरी संस्कृती,   प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच - नितीश भारद्वाज
- सिनेअभिनेते नितीश भारद्वाज यांनी गोंडवाना विद्यापीठाचे व्हीजन मोठे असून, खरी संस्कृती ही इथेच कळून येत असल्याचे दिसते. वनवासी भागामध्ये उत्साह खूप असतो. खरी संस्कृती, प्रकृती, निसर्ग हा जंगल भागातच असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. उत्साह हा क्रीडा तसेच शैक्षणिक या दोन्ही कामांसाठी उपयोगी असतो. म्हणून  विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास व्हायला हवा. विद्यापीठाला १० वर्षे झाली असून विद्यापीठाचे व्हीजन पूर्ण करण्यास विद्यापीठ, विद्यार्थी तसेच सर्वांनी हातभार लावल्यास विद्यापीठाला यश निश्चितच लाभेल, असे मार्गदर्शन नितीश भारद्वाज यांनी केले. चंद्रपूर, गडचिराेली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी काैशल्य विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Funds of Rs. 25 crore will be provided every year for the development of Gandwana University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app