फ्रिजवाल गाईप्रकरणी विश्वासघाताचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:15+5:30

सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी किंवा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारीत या मुद्यावर जोर दिला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे मुद्दे मागे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Fridgewall crime for treason | फ्रिजवाल गाईप्रकरणी विश्वासघाताचा गुन्हा

फ्रिजवाल गाईप्रकरणी विश्वासघाताचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीच्या एका संचालकाला अटक : उर्वरित संचालकांवर कारवाई होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय लष्कराने शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी दिलेल्या जवळपास दोन कोटी रुपये किमतीच्या फ्रिजवाल गायी हडपण्याचा प्रयत्न करणाºया प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकावर अखेर सोमवार दि.६ च्या रात्री ११ वाजून १० मिनिटांनी विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी संचालक घनश्याम तिजारे याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते.
सदर कंपनीचा संचालक घनश्याम तिजारे याला आरमोरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा पीसीआरही दिला. मात्र या कंपनीच्या इतर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही. याशिवाय महागड्या दुधाळू गाई परस्पर गायब केल्या असताना चोरी किंवा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारीत या मुद्यावर जोर दिला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे मुद्दे मागे पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या ताब्यात असलेल्या गायी शेतकºयांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना कंपनीच्या संचालकांनी गायींची परस्पर विल्हेवाट लावणे ही शेतकºयांचीच नाही तर प्रशासकीय अधिकाºयांचीही फसवणूक आहे. याशिवाय गायी परस्पर घेऊन जाणे ही शासकीय मालमत्तेची चोरी आहे. त्यामुळे हे गुन्हे दाखल होणे गरजेचे असताना त्यावर भर दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आॅफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने गायी मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावापासून तर त्यांच्याकडे गायी सुपूर्द करण्यापर्यंतची कागदपत्रे मागितली आहेत. ही कागदपत्रे ८ जानेवारी रोजी न चुकता हजर करावी, असे तपास अधिकारी सहायक पो.निरीक्षक सी.बी.चौहान यांनी तक्रारकर्र्ते उपायुक्त डॉ.वंजारी यांना कळविले आहे. ही कागदपत्रे पुण्यावरून मागितली असल्याचे डॉ.वंजारी यांनी सांगितले.
या प्रकरणात प्राप्त तक्रारीनुसार कारवाई केली जाणार असून तपासात आणखी काही मुद्दे पुढे येऊ शकतात, असे आरमोरीचे ठाणेदार दिगांबर सूर्यवंशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

केवळ एकावरच गुन्हा का?
प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीने फ्रिजवाल गायी मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावात संचालक म्हणून घनश्याम तिजारे यांच्यासह इतरही काही संचालक मंडळाची नावे नमुद केली आहेत. त्यामुळे कंपनीच्या सर्व व्यवहारांसाठी संपूर्ण संचालक मंडळ जबाबदार असताना केवळ एकाच संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बाकी संचालकांवर केव्हा कारवाई होणार, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

Web Title: Fridgewall crime for treason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय