पाच हजार मजुरांना मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:01+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता घेण्याची धडपड करतात. यावर्षी गट ग्राम पंचायत अंतर्गत गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

Five thousand workers got jobs | पाच हजार मजुरांना मिळाले काम

पाच हजार मजुरांना मिळाले काम

googlenewsNext
ठळक मुद्देतेंदूपत्ता संकलन : तोडसा गट ग्राम पंचायत हद्दीतील गावांमध्ये हंगाम

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे सुरू झाले आहे. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे. तोडसा गट ग्राम पंचायत अंतर्गत पाच हजार आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला. त्यामुळे या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम जोमात सुरू आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता घेण्याची धडपड करतात. यावर्षी गट ग्राम पंचायत अंतर्गत गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे कोणतेही तेंदूपत्ता कंत्राटदार गावात येण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी जिल्ह्यातील कंत्राटदारांना बोलावून शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करीत गावात तेंदूपत्ता संबंधित चर्चा केली. गाव सभेत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर तेंदूपत्ता संकलन करण्याचे ठरविण्यात आले. सरपंच प्रशांत आत्राम यांच्या नेतृत्त्वात सध्या तेंदूपत्ता हंगाम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे गट ग्राम पंचायत अंतर्गत पाच हजार आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला आहे. कुटुंबासह मजूर तेंदूपत्ता संकलन करीत आहेत.
तेंदूपत्ता हंगामातून प्राप्त झालेल्या पैशाचा सदुपयोग शेतकरी खरीप हंगामात करतात. बियाणे, खते, कीटकनाशके व अन्य वस्तूंची खरेदी तेंदूपत्त्याच्या पैशातून करतात. त्यामुळे दरवर्षीचा तेंदू हंगाम शेतकऱ्यांना बºया प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारा ठरतो.

Web Title: Five thousand workers got jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.