महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:24+5:30

नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या महिला नक्षलवाद्यांनी चळवळ सोडून आत्मसमर्पण करावे व आमच्या प्रमाणोच नवीन व सुखीसमाधानी जिवनाची सुरूवात करावी, असे आवाहन आत्मसमर्पीत महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून केले आहे. नक्षलवादी जिवनाला कंटाळून गडचिरोली पोलिसंमोर आजपर्यंत १९४ महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

Female Naxalites should surrender | महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे

महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे

Next
ठळक मुद्देआत्मसमर्पितांचे आवाहन : महिला दिनाचे औचित्य

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या महिला नक्षलवाद्यांनी चळवळ सोडून आत्मसमर्पण करावे व आमच्या प्रमाणोच नवीन व सुखीसमाधानी जिवनाची सुरूवात करावी, असे आवाहन आत्मसमर्पीत महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून केले आहे.
नक्षलवादी जिवनाला कंटाळून गडचिरोली पोलिसंमोर आजपर्यंत १९४ महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. महिला दिनाचे औचित्य साधून या आत्मसमर्पीत महिला एकत्र आल्या. त्यांनी नक्षलवादी चळवळी दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला असता, अनेकांच्या अंगावर शहारे उमटले. त्या नरक यातनांच्या आठवणी आता आपल्याला नकोत, अशी भावना व्यक्त केली. आपण जे भोगले आहे, ते सध्या नक्षल चळवळीत असलेल्या महिलांच्याही वाट्याला येत आहे. मात्र यातून सुटका करणे शक्य आहे. त्यासाठी महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन केले. वरिष्ठ तेलगू नक्षलवादी भोळ्या आदिवासींना नक्षल चळवळीत नेऊन त्यांची फसवणूक करीत आहेत, असे मत व्यक्त केले.

Web Title: Female Naxalites should surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.