दारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:27 AM2018-10-14T01:27:17+5:302018-10-14T01:28:33+5:30

बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्माण होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषध निर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील हे ध्येय्य समोर ठेवणे जास्त आवश्यक आहे.

Drug companies have been opposing alcohol and tobacco production | दारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा

दारू आणि तंबाखू निर्मितीला औषध कंपन्यांनी विरोध करावा

Next
ठळक मुद्देअभय बंग : मुंबईत लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बदलत्या जीवनशैलीमुळे नवनवीन रोग निर्माण होत आहेत. या रोगांवरील नियंत्रणात औषध निर्माण शास्त्राची महत्वाची भूमिका आहे. पण रोगांवरील नियंत्रणासाठी निव्वळ औषध निर्मिती न करता लोकांचे आरोग्य कसे चांगले राहील हे ध्येय्य समोर ठेवणे जास्त आवश्यक आहे. यासाठी सर्व औषध कंपन्यांनी अल्काहोल आणि तंबाखू या व्यवसायांना नाही म्हणत त्यांचा विरोध करावा, असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून काम करणारे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना आॅर्गनायझेशन आॅफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स आॅफ इंडियाच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने ११ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे वार्षिक दिवस कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. डॉ. राणी बंग आणि सर्चच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग, ओप्पीचे अध्यक्ष वैधिश, महासंचालक कंचना टीके यांच्यासह देशभरातील औषध कंपन्यांचे राष्ट्रीय प्रमुख उपस्थित होते.
भारतात सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी दुर्गम भागातील लोकांपर्यंत औषधी पोहोचणे गरजेचे असून त्यासाठी औषध कंपन्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. बंग यांनी यावेळी केले.

Web Title: Drug companies have been opposing alcohol and tobacco production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.