जिल्हा बँक उत्कृष्ट सेवेसाठी होणार सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:21+5:30

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांना सेवा देत आहेत. दुर्गम भागात असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडल्या आहेत. जिल्ह्यात बँकेचे एकूण ३० एटीएम आहेत. ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

District Bank will be honored for outstanding service | जिल्हा बँक उत्कृष्ट सेवेसाठी होणार सन्मानित

जिल्हा बँक उत्कृष्ट सेवेसाठी होणार सन्मानित

Next
ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधांची दखल : सलग सातव्यांदा कै.वैकुंठभाई मेहता पुरस्काराची मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्याचे मूल्यांकन करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील फक्त तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०१८-१९ या वर्षातील कामगिरीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा सहकारी बँक सलग सातव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली असून गेल्या तीन वर्षांपासून बँकेने प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांना सेवा देत आहेत. दुर्गम भागात असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडल्या आहेत. जिल्ह्यात बँकेचे एकूण ३० एटीएम आहेत. ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ५५ शाखांच्या माध्यमातून बँक तळागाळातील ४ लख ३० हजार ग्राहकांना बँकींग सेवा देत आहेत. बँकेकडे १ हजार ७५० कोटींच्या ठेवी आहेत. ९९० कोटींचे कर्ज वाटप केले आहेत. तीन हजार कोटींच्या व्यवसाय वाटचालीकडे बँक प्रगती करीत आहे.
बँकेला पुरस्कारापर्यंत पोहोचविण्यात बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, सर्व संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्यासह ग्राहक व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बँकींगचे व्यवहार याच बँकेमार्फत होत असून दुर्गम भागातही बँकेची सेवा मिळत आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
पुरस्काराचे वितरण १० फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. २०१८-२९ चा प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेला जाहीर झाला. द्वितीय पुरस्कार सातारा तर तृतीय पुरस्कार सिंधूदुर्ग जिल्हा सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्हा बँकेने सन २०१२ ते २०१८-१९ या वर्षांमध्ये सलगत सातव्यांदा पुरस्कार पटकाविला आहे.

Web Title: District Bank will be honored for outstanding service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक