महिला बचत गटांना ट्रॅक्टर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:11+5:30

आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे. त्यासाठीच अनुदानावर महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यातून हरित क्रांतीसोबतच महिला शेतकऱ्यांची प्रगती साधावी, असे आवाहन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी याप्रसंगी बोलताना केले.

Distribution of tractors to women's self help groups | महिला बचत गटांना ट्रॅक्टर वाटप

महिला बचत गटांना ट्रॅक्टर वाटप

Next
ठळक मुद्देमानव विकास कार्यक्रम : शेतीसह इतर कामांसाठी उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/आलापल्ली : मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत अहेरी तालुक्यातील आदिवासी महिला बचतगटांना ट्रॅक्टर व कृषी औजारांचे वाटप सोमवारी करण्यात आले. आलापल्ली येथे एकूण नऊ महिला बचत गटांना हे वाटप करण्यात आले.
यावेळी आ.धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते फित कापून लाभार्थ्यांकडे गाड्यांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश जगताप, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस.एस.कºहाडे, तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे, आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे आदी उपस्थित होते.
आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे. त्यासाठीच अनुदानावर महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यातून हरित क्रांतीसोबतच महिला शेतकऱ्यांची प्रगती साधावी, असे आवाहन आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी याप्रसंगी बोलताना केले.
महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शेतीसोबतच औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी सुद्धा ड्रायव्हींग करून पुरूषांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहावे, असा सल्ला जि.प.सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी दिला. कार्यक्रमाला बचत गटांच्या महिला व शेतकरी उपस्थित होते. अहेरी उपविभागाच्या इतर तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

Web Title: Distribution of tractors to women's self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.