नागरिकांना दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:30+5:30

महसूल विभागामार्फत सदर शिबिरात १०० लाभार्थ्यांना जातीचे दाखले, ३२ नागरिकांना राशनकार्ड, मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम, संचालन व आभार जिमलगट्टाचे तलाठी सचिन मडावी यांनी मानले. आर.पी.सिडाम यांनी जातीच्या दाखल्यांपासून वंचित असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून यासाठी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करून जातीचे दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

Distribution of certificates to citizens | नागरिकांना दाखल्यांचे वाटप

नागरिकांना दाखल्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देजिमलगट्टा येथे समाधान शिबिर : ६५ गावातील नागरिकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा मंडळ कार्यालयाअंतर्गत जिमलगट्टा येथे १० फेब्रुवारी रोजी सोमवारला राजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे नायब तहसीलदार अनिल गुट्टे होते. उद्घाटन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टा येथील उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सुरज निंबाळकर, ग्रामसेवक दामोधर सिडाम, उपसरपंच मदना नैताम, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावळे, डॉ.शशिकांत उपगन्लावार, संजय गज्जलवार, शाख व्यवस्थापक भाऊसाहेब भंडारीवार, महेश मद्देर्लावार, तलाठी सचिन मडावी, रावसाहेब टेकाम आदी उपस्थित होते. याप्रसंगी गायकवाड यांनी नागरिकांना शिबिराचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांना मिळालेल्या जातीच्या दाखल्याचा वापर शासकीय योजनांसाठी करावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.
आपल्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, आपले गाव व समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कोणतीही अडचण आल्यास आम्ही सदैव तुमची मदत करणार, अशी ग्वाही एसडीपीओ गायकवाड यांनी दिली.
महसूल विभागामार्फत सदर शिबिरात १०० लाभार्थ्यांना जातीचे दाखले, ३२ नागरिकांना राशनकार्ड, मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर.पी.सिडाम, संचालन व आभार जिमलगट्टाचे तलाठी सचिन मडावी यांनी मानले. आर.पी.सिडाम यांनी जातीच्या दाखल्यांपासून वंचित असणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करून यासाठी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करून जातीचे दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. कृषी विभागाचे भाऊसाहेब इंगळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी मार्फत बाळ कुपोषित राहू नये, यासाठी पौष्टिक आहाराचे सर्व नमूने प्रदर्शीत करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिमलगट्टा महसूल मंडळाअंतर्गत सीताराम कुळमेथे, रामचंद्र कुमरे, श्रीनिवास पानेम, रूपेंद्र तलांडी, सोमना गावळे, अशोक दिकोंडा, राहुल गोडबोले आदी कोतवालांनी सहकार्य केले.

योजनेचा लाभ घ्या
महसूल विभागाच्या वतीने आर्थिक लाभाच्या विविध योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय वृद्धापकाळ, निराधार, अपंग, विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेऊन मासिक मानधनाचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन अहेरीचे नायब तहसीलदार अनिल गुट्टे यांनी यावेळी केले.

Web Title: Distribution of certificates to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.