अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:00 AM2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:26+5:30

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो.

Dig the Iconia into Lake Ankisa | अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी साठवणुकीवर परिणाम, मासेमारीस अडचण

n  लाेकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावाचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. परंतु संपूर्ण तलावाला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातल्याने तलावातील पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. शिवाय येथे मासेमारी करण्यास अडचणी येत आहेत.
सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो. लिलावानंतर दरवर्षी पावसाळ्यात लिलावातून मालकी प्राप्त झालेले नागरिक येथे मत्स्यबीज टाकतात. दिवाळी व मकरसंक्रातीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. वाढ झाल्यानंतर मत्स्यबीजाची विक्री करण्याकरिता संबंधित नागरिक तलावातील मासे पकडतात. परंतु या तलावाला इकॉर्निया वनस्पतीचा विळखा असल्याने मासे पकडण्यासाठी योग्य प्रकारे जाळ टाकता येत नाही. 
सध्या संपूर्ण तलावात इकॉर्निया वनस्पती दिसून येते. सदर वनस्पती सध्या फुलली असल्याने उठावदार दृश्य दिसून येते. असे असले तरी या वनस्पतीमुळे तलावातील जलसाठा क्षमतेवर परिणाम होत आहे.
जवळपास दोन ते तीन फूट ही वनस्पती वाढते. दरवर्षी एप्रिल महिन्यात फूल येऊन त्यातील बिया खाली गळतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या उगवतात. विशेष म्हणजे एका वर्षी वाढलेली ही वनस्पती तलावात पूर्णत: कुजून मातीमोल होते. त्यामुळे तलावाच्या आतील भाग दरवर्षी उथळ होत असते. याचा परिणाम पाणी साठवणुकीवर होत आहे. 
या तलावातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाळ्यानंतर विशेषत: जानेवारी महिन्यात फुले येण्याआधी या वनस्पतीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Dig the Iconia into Lake Ankisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.