देसाईगंज व कोरची पं.स. राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:59+5:30

केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकनासाठी निवडण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक पंचायत समितीने या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणे गरजेचे होते.

Desaiganj and Korchi P.S. Top in the state | देसाईगंज व कोरची पं.स. राज्यात अव्वल

देसाईगंज व कोरची पं.स. राज्यात अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्राकडून घोषणा : पंडित दीनदयालय उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारास पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/कोरची : पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारने केली असून त्यात नॉनपेसा गटातून देसाईगंज तर पेसा गटातून कोरची पंचायत समिती राज्यात अव्वल ठरल्या आहेत.
केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकनासाठी निवडण्यात आले होते. राज्यातील प्रत्येक पंचायत समितीने या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणे गरजेचे होते. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरून मूल्यांकन करून सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवायचे होते. यात पेसाविरहित (नॉनपेसा) गटातून देसाईगंज पंचायत समिती तर पेसा गटातून कोरची पंचायत समिती राज्यात अव्वल आल्याची घोषणा केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने १६ जून रोजी केली.
प्रथम जिल्हास्तरावर या पुरस्कार प्रस्तावाचे मूल्यांकन करून प्रथमस्थानी आलेल्यांचे प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर राज्याकडे व राज्याकडून केंद्राकडे असे टप्पे देण्यात आले होते. हे सर्व टप्पे पार करीत कोविड-१९ च्या प्रादुर्भावापूर्वी राज्य शासनाने विभागीय पुरस्कारासाठी मुंबई येथे रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता. आता राज्यस्तरावर कोरची व देसाईगंज पंचायत समिती अव्वल आल्याने त्या पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे होणार आहे, अशी माहिती देसाईगंज पं.स.चे गटविकास अधिकारी श्रावण सलाम यांनी दिली.
सदर पुरस्कारासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, देसाईगंज पं.स.सभापती रेवता अलोणे, माजी सभापती मोहन गायकवाड यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, सरपंच, कर्मचारी व ग्रामसेवकांचे योगदान असल्याची प्रतिक्रिया गटविकास अधिकारी सलाम यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकाचवेळी दोन पंचायत समित्यांना राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढणार आहे.

नऊ विषयाच्या निकषांवर झाले मूल्यांकन
सदर पुरस्कारासाठी केंद्र सरकारने एकूण १०० गुणांची प्रश्नावली निश्चित केली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा (पिण्याचे पाणी, पथदिवे, पायाभूत सुविधा), नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, दुर्लक्षित घटक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, आपत्ती व्यवस्थापन, उत्पन्न वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, ग्रा.पं.च्या विकासासाठी स्वेच्छेने काम करणाºया व्यक्ती, संस्था व ई-गव्हर्नन्स असे एकूण नऊ विषय सदर पुरस्कार स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते.

पंचायत समितीअंतर्गत सर्व योजना, तसेच केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत विविध विभागांच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात पंचायत समितीला यश आले. त्यामुळे गुणांकानुसार हा पुरस्कार प्राप्त झाला. सीईओ डॉ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा हा पुरस्कार आहे.
- देवीदास देवरे,
गटविकास अधिकारी, कोरची

Web Title: Desaiganj and Korchi P.S. Top in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.