शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:30+5:30

शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शासनाने २३ नोव्हेंबर २०१६ रोजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याना मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार केंद्र शासनाने दोन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले.

Demonstrations of Shapoa staff | शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next
ठळक मुद्दे१८ हजार रुपये मासिक मानधन द्या : कुरखेडा पंचायत समितीसमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : मानधनवाढीच्या आश्वासनांची पुर्तता करावी, या मुख्य मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय मेळावा आयोजित करून कुरखेडा पंचायत समितीसमोर निदर्शने केली.
शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शासनाने २३ नोव्हेंबर २०१६ रोजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याना मासिक पाच हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार केंद्र शासनाने दोन हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. मात्र अजुनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन सुध्दा मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहे. केंद्रीय कामगार संघटनेच्या मागणीनुसार त्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, सामाजिक सुरक्षा लागू करावी, इंधन बिलाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करावी, वर्षातून दोन वेळा ड्रेसकोड व ओळखपत्र द्यावे. चुकीच्या पध्दतीने कामावरून कमी करू नये, कामाची वेळ निश्चित करून पोषण आहाराव्यतिरिक्त इतर कामे सांगू नये, आदी मागण्यांसाठी पंचायत समिती समोर निदर्शने करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांनी केले. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप नाईक, विमल बर्डे, शितल नैताम, कविता ढोलणे, वंदना देशमुख, सुमन नैताम, पार्वता पोरेटी, शारदा पंधरे, देवला मेश्राम, यश्वदा नरोटे, वासुदेव पुडो, रेवता गावडे, शालू पेंदाम, वर्षा कोल्हे, संतोष घरत, सविता प्रधान, निर्मला दुमाने, संगीता मडावी यांच्यासह तालुकाभरातील ५० पेक्षा अधिक शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations of Shapoa staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.