जिल्हाभरात मार्च काढून पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:46+5:30

शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून अयोध्या येथील रामजन्म भूमीबाबतचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस विभागाचे अधिकारी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातून मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये शेकडो पोलीस सहभागी झाले होते.

Demonstrate the power of the police by marching across the district | जिल्हाभरात मार्च काढून पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

जिल्हाभरात मार्च काढून पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शनिवारी रामजन्म भूमीबाबतचा निकाल जाहीर झाला. तसेच रविवारी मुस्लीम समाजाचा मुस्लीम समाजाचा सन ईद-ए-मिलाद आहे. या दोन्ही बाबींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी पोलिसांमार्फत मार्च काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून अयोध्या येथील रामजन्म भूमीबाबतचा निकाल जाहीर करण्यास सुरूवात झाली. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस विभागाचे अधिकारी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातून मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये शेकडो पोलीस सहभागी झाले होते. जिल्ह्यात दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रात्री उशीरापर्यंत गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.
अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, पोलीस निरिक्षक प्रविण डांगे यांच्या नेतृत्वात अहेरी व आलापल्ली या शहरांमध्ये मार्च काढण्यात आला.

‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड मॅसेजेस’
रामजन्म भूमीच्या निकालाबाबत आक्षेपार्ह प्रतिक्रिया पाठविल्यास संबंधित व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन व पाठविणारा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यामुळे अनेक ग्रुप अ‍ॅडमिननी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपची सेटिंग बदलवून ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड मॅसेजेस’ ही सेटिंग ठेवली. त्यामुळे दिवसभर व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर मॅसेजचा होणारा भडीमार थांबला होता.

Web Title: Demonstrate the power of the police by marching across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस