मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरातमध्ये झालेल्या चकमकीतील मृत्यूची होणार दंडाधिकारीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 07:10 PM2020-02-16T19:10:56+5:302020-02-16T19:11:22+5:30

गडचिरोली : भामरागड पोलीस स्टेशनअंतर्गत मौजा मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरात गेल्या ३० नोव्हेंबर २०१९ रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सशस्त्र चकमक ...

Criminal inquiry into death in clash in Moremata-Nelgunda forest area | मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरातमध्ये झालेल्या चकमकीतील मृत्यूची होणार दंडाधिकारीय चौकशी

मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरातमध्ये झालेल्या चकमकीतील मृत्यूची होणार दंडाधिकारीय चौकशी

Next

गडचिरोली : भामरागड पोलीस स्टेशनअंतर्गत मौजा मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरात गेल्या ३० नोव्हेंबर २०१९ रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सशस्त्र चकमक झाली होती. त्यानंतरच्या शोधमोहिमेदरम्यान घटनास्थळावर शस्त्रासह दोन पुरूषांचे (नक्षलवाद्यांचे) मृतदेह सापडले. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध लावण्यासाठी सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये चौकशी केली जात आहे. यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस मदत केंद्र धोडराजअंतर्गत मौजा मोरमेटा-नेलगुंडा जंगल परिसरात सशस्त्र चकमक  झाली होती. त्यानंतर दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती कोणाला असल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे १५ दिवसांच्या आत निवेदन द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, एटापल्ली  यांनी कळविले.

Web Title: Criminal inquiry into death in clash in Moremata-Nelgunda forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.