जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील सुभगॉन या शेतकरी उत्पादक कंपनीने जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यास सुरूवात ...

Creation of a trichocard for biological pest control | जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती

जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनव प्रयोग : शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील सुभगॉन या शेतकरी उत्पादक कंपनीने जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ट्रायकोकार्डची निर्मिती केली जात आहे. ट्रायकोकार्डमुळे उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या दर्जाचे शेती उत्पादन होण्यास मदत होणार आहे.
धान, सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींमुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता राहते. कीड मारण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करते. कीटकनाशकांमुळे शेती उत्पादन विषयुक्त बनते. तसेच शेतीचा खर्चही वाढतो. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कधीकधी कीड नियंत्रणात येत नाही. जैविक कीड नियंत्रण हा सर्वात चांगला उपाय आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होते. जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोकार्डचा वापर हा सर्वात प्रभावी उपाय मानल्या जातो. ट्रायकोकार्डवर ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची निर्मिती केली जाते. सदर कार्ड शेतकºयाला नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिले जाते. ट्रायकोग्रामा हा कीटक पतंगवर्गीय किडींचे अंडी खाते. त्यामुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होते. ट्रायकोकार्डच्या वापरामुळे कीटकनाशकांवरील खर्च कमी होण्यास मदत होते. तसेच कीटकनाशकांचा वापर केला जात नसल्यामुळे शेती उत्पादनाचा दर्जा चांगला राहतो.
केंद्रीय अर्थसहाय विशेष अर्थसहायक योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या नावीण्यपूर्ण योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, आत्माचे बीटीएम आकाश लवटे यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम राबविला जात आहे.

काय आहे ट्रायकोकार्ड?
ट्रायकोग्रामा हा कीटक पतंगवर्गीय किडींचे अंडी खाऊन उपजीविका करतो. तो जवळपास १५० ते २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे या कीटकाला मित्र कीटक असे संबोधले जाते. तसेच ट्रायकोग्रामा हा कीटक इतर किडींच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालते. तसेच इतर किडीच्या अंड्यांचा आतला भाग खाऊन मग कोषावस्थेत जाते. त्यामुळे कीड नियंत्रणास फार मोठी मदत होते. भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणाºया अळ्या, सूर्यफुलावरील घाटे अळी, धानावरील खोड कीडी, कपाशीवरील बोंड अळी, ट्रायकोग्रामा कीटक फस्त करते.

एका एकरासाठी लागते एकच कार्ड
मुलचेरा शेतकरी उत्पादक कंपनीने ट्रायकोग्रामा कीटकाची अळी बंगलुरू येथून आणली आहेत. त्यांची पैदास वाढविण्याचे काम सुरू आहे. ट्रायकोग्रामा कीटकाने कार्डवर अंडी टाकावी, यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. ज्या कार्डवर ट्रायकोग्रामा कीटकाची अंडी राहतात, त्याला ट्रायकोकार्ड संबोधले जाते. पोस्टाच्या आकाराच्या कार्डवर सुमारे २० हजार अंडी राहतात. एक कार्ड एका एकरच्या शेतासाठी उपयोगी पडते.

Web Title: Creation of a trichocard for biological pest control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती