Coronavirus : देवेंद्र फडणवीसांनी घेतला गडचिरोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्युदर कमी करण्यासाठी केली अशी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:18 PM2021-05-07T17:18:41+5:302021-05-07T17:19:33+5:30

Coronavirus in Gadchiroli : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली.

Coronavirus: Devendra Fadnavis reviews corona situation in Gadchiroli, suggests giving priority to vaccination to reduce mortality | Coronavirus : देवेंद्र फडणवीसांनी घेतला गडचिरोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्युदर कमी करण्यासाठी केली अशी सूचना

Coronavirus : देवेंद्र फडणवीसांनी घेतला गडचिरोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा, मृत्युदर कमी करण्यासाठी केली अशी सूचना

Next

गडचिरोली : जिल्हयातील कोरोना मृत्युदर कमी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकानी लासिकरण करावे, आरोग्य विभागानेही तसे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर जिल्हयातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला व जिल्हयात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.          
      
यावेळी माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि.प.सीईओ कुमार आशीर्वाद, नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत शंभरकर,  यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना जिल्ह्यात किती प्रमाणात लसीकरण झाले याबाबतची माहिती घेतली. जिल्हयातील अधिकाधीक लोकांना लस कशी उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता  असल्याचे ते म्हणाले. त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी दिले.

Web Title: Coronavirus: Devendra Fadnavis reviews corona situation in Gadchiroli, suggests giving priority to vaccination to reduce mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.