राष्ट्रसंतांचे योगदान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:33+5:30

तालुक्यातील विठ्ठलपूर येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दादा परसोडे, विनोद गौरकार, गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी पंडीत पुळके, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, प्रकाश सातपुते व डोमदेव सातपुते, रवींद्र वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

The contribution of nations is greater | राष्ट्रसंतांचे योगदान मोठे

राष्ट्रसंतांचे योगदान मोठे

Next
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : विठ्ठलपुरात विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : राष्ट्रसंत वंदनिय तुकडोजी महाराज यांना ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणण्याचे मोठे कार्य केले. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोठे व मौलिक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
तालुक्यातील विठ्ठलपूर येथे विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं.स. सदस्य दादा परसोडे, विनोद गौरकार, गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी पंडीत पुळके, वाकडीचे सरपंच चरणदास बोरकुटे, प्रकाश सातपुते व डोमदेव सातपुते, रवींद्र वाकुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, राष्ट्रसंताच्या आचार व विचारांची आज देशाला खरी गरज आहे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंताच्या अनमोल कार्याचा व विचाराचा प्रचार व प्रसार गावागावात झाला पाहिजे, असे नेते यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी राष्ट्रसंताच्या विचारकार्यांवर प्रकाश टाकला. ग्रामगीतेच्या माध्यमातून आदर्श जीवनाचा संदेश राष्ट्रसंतांनी सर्वांना दिला, असे सांगितले.
सदर भजन स्पर्धेत विदर्भातील १५ पेक्षा अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला. दरम्यान बऱ्याच भजन मंडळांनी राष्टÑसंताचे भजन अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, गावातील नागरिक व गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले. विठ्ठलपूर येथे दरवर्षी भजन स्पर्धा आयोजित केली जाते.

Web Title: The contribution of nations is greater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.