जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकेचा मोलाचा वाटा- डॉ.बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:32+5:30

बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले.

Co-operative Bank contributes to the development of the district - Dr. Bang | जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकेचा मोलाचा वाटा- डॉ.बंग

जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकेचा मोलाचा वाटा- डॉ.बंग

Next
ठळक मुद्देशोधग्राममध्ये एटीएम सुविधा : दुर्गम भागात सुविधेसाठी विशेष प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ अर्थकारण न करता समाजाला काहीतरी देणे आहे या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याच भावनेतून ग्रामीण व आदिवासी भागात बँकिंग सुविधा पुरवून विकासात मोलाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार सर्चचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी काढले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चातगाव येथील शोधग्राममध्ये एटीएमचे उद्घाटन सर्चच्या संचालक डॉ.राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.बंग मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, बँकेचे मानद सचिव अनंद साळवे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले.
अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, डॉ.बंग दाम्पत्याच्या मार्गदर्शन व सहकार्याने जिल्हा बँकेला दुर्गम भागात कामगिरी करताना मदत झाली आहे. आॅफसाईड एटीएमच्या परवानगीसाठी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार व डॉ.आनंद बंग यांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
कार्यक्रमाला डॉ.आनंद बंग, मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, व्यवस्थापक पी.डब्ल्यू. भुरसे, जी.के. नरड, विधी अधिकारी अविनाश मुर्वतकर आदी उपस्थित होते. संचालन सुयेश तोषणीवाल, प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार तर आभार भूषण केळझरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन तुषार खोरगडे यांनी केले.

रुग्ण-नातेवाईकांसाठी सोय
सर्चमध्ये दरदिवशी शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. त्यांना पैशाची गरज भासल्यास वेळेवर धानोरा किंवा गडचिरोली येथे जावे लागत होते. आता एटीएमची सुविधा सर्चमध्ये झाल्याने गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांसाठी सोयीचे झाले आहे. सर्चमधील नोकरदार वर्ग, सामान्य जनतेला सुद्धा एटीएमचा वापर करता येणार आहे.

Web Title: Co-operative Bank contributes to the development of the district - Dr. Bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.