पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:32+5:30

नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.

Build bridges otherwise boycott elections | पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

पूल बांधा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

Next
ठळक मुद्देठेंगण्या पुलामुळे अडते पावसाळ्यात वाट : कुंभी (मोकासा) व माडेमूल येथील गावकऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्यात वाट अडविणाºया पोटफोडी नदीवर उंच पूल बांधावा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा माडेमूल व कुंभी (मोकासा) येथील नागरिकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
माडेमूल व कुंभी ही दोन्ही गावे जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहेत. या दोन्ही गावांना जाण्यासाठी पोटफोडी नदी ओलांडून जावे लागते. दुसरा कोणताही मार्ग नाही. गावकऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेने २००२ मध्ये सिमेंटचे पाईप टाकून पूल बांधून दिला. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी राहते. पावसाळ्याच्या दिवसात जवळपास दीड ते दोन महिने पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. दोन्ही गावांना पोटफोडी नदी मार्गाशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नाही. ठेंगण्या पुलावरून आजपर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. २०१६ मध्ये पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी वाहून गेला. यावर्षी सुद्धा २१ आॅगस्ट रोजी तिसºया वर्गात शिकणारा हेमंत किशोर निकुरे हा वाहून गेला. दुसºया दिवशी त्याचा मृतदेह विहिरगाव येथील पुलाखाली सापडला.
नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून पाणी असतानाही पुढचा प्रवास करावा लागतो. पाणी एकदमच जास्त असल्यास कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. गावात चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवीपासून विद्यार्थी चांदाळा, गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. पावसाळ्यात मात्र या विद्यार्थ्यांची शाळा बुडते. गरोदर माता, लहान बालके यांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
यानंतरच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. याबाबत गावकरी जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहेत. पत्रकार परिषदेला सरपंच पुष्पा सोनुले, ग्रा.पं.सदस्य डिम्पल बांबोळे, विजय मडावी, तुळशिराम मेश्राम, यश्वगीता गेडाम, निवृत्ता नैताम, वैशाली सोनुले, रमेश कुमरे, हितराज बांबोळे, राकेश मोहुर्ले, अशोक मोहुर्ले यांच्यासह कुंभी व माडेमूल येथील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते.

१५ दिवस उलटूनही नुकसानीचा पंचनामा नाही
अतिवृष्टीमुळे कुंभी व मोडेमूल येथील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनपर्यंत कृषी सहायक, तलाठी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नुकसानीचा पंचनामा केला नाही. कृषी सहायक व तलाठ्याचे या दोन्ही गावांमध्ये दर्शनच होत नाही. अनेकांना तर कृषी सहायक व तलाठ्याचे नाव सुद्धा माहित नाही. पंचनामे न झाल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
कुंभी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. नवीन इमारत बांधण्याची मागणी गावकºयांनी केली.

Web Title: Build bridges otherwise boycott elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.