पालिकेच्या शिबिरात सफाई कामगारांसह १६ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:01:09+5:30

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Blood donation of 16 persons including cleaning workers in the municipality camp | पालिकेच्या शिबिरात सफाई कामगारांसह १६ जणांचे रक्तदान

पालिकेच्या शिबिरात सफाई कामगारांसह १६ जणांचे रक्तदान

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे प्रतिपादन । रक्तच मानवाचे प्राण वाचवू शकते

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषद गडचिरोली, एचडीएफसी बँक व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नगर परिषद, एचडीएफसी बँक कर्मचारी व सफाई कामगार मिळून एकूण १६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्यात नेहमी रक्ताची टंचाई भासत असते. जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील रुग्णालयामध्ये विविध आजाराने ग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने औषधोपचारासाठी भरती होतात. आधुनिकीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली असून त्याबरोबर अपघातही वाढले आहे. या अपघातात बरेच लोक जखमी होतात. अशा जखमी व विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असते. सिकलसेल रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. त्यांना रक्त पुरवठा न झाल्यास धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्ताचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्ष पिपरे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्याधिकारी संजीव ओहोळ व नगरसेवक प्रमोद पिपरे यांनीही आपल्या भाषणातून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. मानवाचे जीवन अमूल्य आहे, आपले रक्त कोणत्याही नागरिकाच्या कामी येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नगर परिषद, एचडीएफसी बँक तसेच पालिकेच्या नाली सफाई रोजंदारी कामगारांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 16 persons including cleaning workers in the municipality camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.