भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:22+5:30

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ठाकरे सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले.

BJP workers staged protests | भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

भाजप कार्यकर्त्यांनी केली निदर्शने

googlenewsNext
ठळक मुद्देमागणी : महिला व बाल विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असल्याने राज्य शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ठाकरे सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, किसान आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, महामंत्री विनोद देवोजवार, नगरसेविका निता उंदिरवाडे, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शाम वाढई, राजू शेरकी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी केंद्र शासनाचा सुधारित कृषी कायदा राज्यात तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा राज्यात लागू न करता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी विरोधी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मागे घेऊन सुधारित कृषी कायदा लागू करण्याची मागणी केली.

केंद्र शासनाचा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा -डॉ. होळी
शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल विकण्यास स्वातंत्र्य मिळाल्यास कृषी मालाला चांगला भाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाने केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असा दावा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केला आहे. जे आजपर्यंत शक्य झाले नाही, ती बाब केंद्र शासनाने करून दाखविली आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात जळाऊ वृत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडत आहेत. महाराष्ट्र शासनाने या कायद्याला विरोध केला आहे. मात्र हे चुकीचे आहे. कृषी कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबी आहेत. त्यामुळे या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आदी उपस्थित होते.

Web Title: BJP workers staged protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.