चक्क ११ वाजता उघडते बँंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:49+5:30

एटापल्ली तालुक्यात एसबीआय ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. जुनी बँक असल्याने या बँकेत अनेक ग्रामीण भागातील नागरिकांची बँक खाती आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे सानुग्रह अनुदान याच बँकेच्या खात्यात जमा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक पैसे काढण्यासाठी या बँकेत येतात. या बँकेची चांगली उलाढाल आहे. मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे खातेदार कमालीचे त्रस्त आहेत.

The bank opens at 11am | चक्क ११ वाजता उघडते बँंक

चक्क ११ वाजता उघडते बँंक

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची मनमानी : ग्राहकांची होते ससेहोलपट

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : १ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँका ९ वाजेपासून सुरू करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. मात्र एटापल्ली येथील राष्ट्रीयीकृत बँक सोमवारी तब्बल ११ वाजता उघडण्यात आली. ग्रामीण भागातून आलेले नागरिक दरवाजाजवळ बँक उघडण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
एटापल्ली तालुक्यात एसबीआय ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. जुनी बँक असल्याने या बँकेत अनेक ग्रामीण भागातील नागरिकांची बँक खाती आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे सानुग्रह अनुदान याच बँकेच्या खात्यात जमा होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक पैसे काढण्यासाठी या बँकेत येतात. या बँकेची चांगली उलाढाल आहे. मात्र कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे खातेदार कमालीचे त्रस्त आहेत. यातील अनेक कर्मचारी ये-जा करतात. विशेष म्हणजे, ठरवून दिलेल्या वेळेच्या उशीरा बँक उघडली जाते व लवकरच बंद केली जाते. दुपारच्या सुमारे एक तासाची विश्रांती घेतात. एखाद्या खातेदाराने या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्याला दमदाटी देण्यासही येथील कर्मचारी मागे-पुढे पाहत नाही.
दुर्गम भागातील आदिवासी नागरिक अन्याय झाला तरी सहजासहजी तक्रार करीत नाही. याचा पुरेपूर गैरफायदा येथील कर्मचारी व अधिकारी घेत आहेत. १ नोव्हेंबरपासून ९ वाजता बँक सुरू करण्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देश असताना सोमवारी ही बँक तब्बल ११ वाजता उघडण्यात आली. ग्रामीण भागातून आलेले अनेक खातेदार बँक उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. बँकेतील कर्मचाºयांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे खातेदार कमालीचे त्रस्त आहेत. एसबीआयच्या व्यवस्थापनाने या बँकेला आकस्मिक भेट देऊन चौकशी केल्यास येथील अनागोंदी कारभार उघड होईल.

Web Title: The bank opens at 11am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक