भूम्यांमार्फत कोरोनाबाबत दुर्गम भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:35+5:30

कोरोनाचा प्रसार सद्य:स्थितीत केवळ शहरापुरताच मर्यादित आहे. मात्र योग्य खबरदारी घेतली नाही तर हा विषाणू दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रसार आदिवासी बहुल गावांपर्यंत झाल्यास महामारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Awareness about remote areas of the corona through lands | भूम्यांमार्फत कोरोनाबाबत दुर्गम भागात जनजागृती

भूम्यांमार्फत कोरोनाबाबत दुर्गम भागात जनजागृती

Next
ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यात उपक्रम : चार ठिकाणी घेतल्या सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये भूम्यांमार्फत कोरोना विषाणूबाबत जागृती केली जात आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
कोरोनाचा प्रसार सद्य:स्थितीत केवळ शहरापुरताच मर्यादित आहे. मात्र योग्य खबरदारी घेतली नाही तर हा विषाणू दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रसार आदिवासी बहुल गावांपर्यंत झाल्यास महामारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर यांनी पुढाकार घेतला आहे. एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार यांची भेट घेऊन जनजागृतीची संकल्पना मांडली. एटापल्ली तालुक्यात तोडसा, सुरजागड, वेनासर, रोपीबारसा, जारावंडी हे इलाके आहेत.
प्रत्येक इलाक्याचा भूम्या हा प्रमुख राहतो. भूम्याने सांगितलेल्या सूचनांचे गावातील बहुतांश नागरिक पालन करतात. त्यामुळे भूम्यांच्या मार्फत जागृती केली जात आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोणती खरबरदारी घ्यावी, याबाबतचे पत्रके तहसील कार्यालयाने छापून दिली.
दहागावकर यांनी चारही इलाक्यातील भूम्या, पोलीस पाटील, गाव पाटील, शेंगणा यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले. हे सर्व नागरिक आता गावात जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार दुर्गम भागात पोहोचण्यापूर्वीच येथील जनता सावध राहणार आहे.एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे गावभूम्यांची सभा पार पडली.
या सभेला अडवे गावडे, मालू मडावी, करपा हिचामी, मुरा झोरे, रोपी बरसा, धनीराम पवार, ईश्वर सडमेक आदी हजर होते.

Web Title: Awareness about remote areas of the corona through lands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.